चंदगड वनविभागाच्या वतीने कर्मचाऱ्यांनी जंगलातील पाणवठे असे स्वच्छ करुन जंगली प्राण्यांची तहान भागविण्यासाठीचा प्रयत्न केला आहे. |
चंदगड
/ प्रतिनिधी
वन्यप्राण्यांची उन्हाळ्यात होणारी
पाण्यासाठीची वन-वन थांबण्यासाठी चंदगड वनपरिक्षेत्रातील वनकर्मचाऱ्यांनी श्रमदान
करून पाणवठे स्वच्छतेची मोहीम हाती घेतली आहे. वनक्षेत्रात असलेले नेसर्गिक पाणवठे
स्वच्छ करून वन विभागाने वन्यप्राण्यांसाठी वनक्षेत्रात पाण्याची उपलब्धता करून
दिली आहे. यामुळे वन्यप्राण्यांची पाण्यासाठी मानवी वस्तीकडे होणारी वाटचाल
थांबणार असून पिकांचे नुकसान काही प्रमाणात कमी होणार आहे.
वनविभागाचे कर्मचारी जंगलातील पाणवठा स्वच्छ करताना.
वनपरिक्षेत्र अधिकारी चंदगड ज्ञा. गो. राक्षे
यांच्या पुढाकाराने वनपाल अनिल वाजे, वनरक्षक
श्रीमती कल्पना पताडे, अर्चना शिरसाठ, सुषमा सरोदे, अरुण सांगळे यांच्यासह वनमजुर बाळू पवार, रमेश कोकितकर, सोमा गावडे, कृष्णा गावडे यांनी श्रमदान करून
नियतक्षेत्र कुरणी-बुझवडे अंतर्गत धामापूर जंगल क्षेत्रातील कक्ष क्र. १३९ मध्ये २
पाणवठे श्रमदान करून तयार केले आहेत.
या पाणवठ्यांचा वापर जंगलातील वन्यप्राणी गवे, सांबर, भेकर, रानडुक्कर, अस्वल यांना होणार असून त्याचबरोबर
लहान पशु-पक्षी देखील उन्हाळ्यात पाणवठ्यावर आपली तहान भागवणार आहेत.
No comments:
Post a Comment