कृषी कायदयांमुळे शेतजमीनीवर मूठभर उद्योगपतींची मालकी निर्माण होईल - प्राचार्य डॉ. आनंद मेणसे यांचे प्रतिपादन - चंदगड लाईव्ह न्युज

27 January 2021

कृषी कायदयांमुळे शेतजमीनीवर मूठभर उद्योगपतींची मालकी निर्माण होईल - प्राचार्य डॉ. आनंद मेणसे यांचे प्रतिपादन

चर्चासत्रात मार्गदर्शन करताना प्राचार्य डाॅ. आनंद मेणसे.

चंदगड / सी. एल. वृत्तसेवा

       केंद्र शासनाने कृषी कायदे रद्द करावे अन्यथा या नवीन कायदयांमुळे देशातील शेतजमीनीवर ठराविक मुठभर उद्योगपतींची मालकी निर्माण होईल. शेती उत्पादनाला हमीभाव दया. हरितक्रांतीचे जनक एम. एस. स्वामीनाथन यांच्या शिफारशी शासनाने लागू कराव्यात असे प्रतिपादन बेळगांवच्या जी. एस. एस. कॉलेजचे माजी प्राचार्य कॉम्रेड डॉ. आंनद मेणसे यांनी र. भा. माडखोलकर महाविद्यालय मार्फत वाणिज्य व व्यवस्थापन विभाग आणि प्राध्यापक प्रबोधिनी आयोजित केंद्र सरकारचे शेतीविषयक धोरण आणि शेतकऱ्यांचे आंदोलन या चर्चा सत्रात प्रमुख वक्ते म्हणून बोलताना काढले. अध्यक्षस्थानी न. भु. पाटील ज्युनि. कॉलेजचे प्राचार्य आर. आय. पाटील होते.

चर्चेला उपस्थित श्रोते

       प्रारंभी डॉ. आनंद मेणसे यांच्या हस्ते नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या प्रतिमेचे पूजन करून चर्चासत्राचे उद्घाटन करण्यात आले. प्रा. एस. डी. गोरल यांनी प्रास्ताविकात चर्चासत्राचा उद्देश स्पष्ट करून उपस्थितांचे स्वागत केले.

           प्रमुख वक्ते प्राचार्य मेणसे यांनी आपल्या व्याख्यानात बाजारसमितीत वा बाजार समितीच्या बाहेर किमान आधारभूत किमतीनेच शेतमालाची खरेदी होईल अशी तरतूद असलेले नवीन कायदे तयार झाले पाहिजेत. पण शासनाने कोणत्याही शेतकरी संघटनेशी चर्चा न करता व संसदेत कोणतीही चर्चा न करता आवश्यक वस्तू कायदयातून शेतमाल वगळणे, बाजार समिती बाहेर शेतमालाच्या खरेदी - विक्रीला परवानगी देणे, कंत्राटी शेतीला मान्यता देणे या तीन कायद्यांचा व शेतकरी आंदोलनाचा सविस्तर आढावा घेतला.

       अध्यक्षीय भाषणात आर. आय. पाटील यांनी शेतकरी सुखी तर राष्ट्र सुखी, पण शेतकऱ्यांच्या विरोधात कायदे निर्माण होत असतील तर भारतासारखा कृषीप्रधान देश सुखी होणार नाही हे स्पष्ट करून प्रतिकूल परिस्थितीत ईस्त्रायल सारख्या देशाने कृषीक्रांती कशी घडवून आणली याचा आढावा घेतला. 

       या चर्चासत्रात माजी प्राचार्य एस. व्ही. गुरबे, प्रा. किर्तीकुमार, एस. जी. सातवणेकर सह र. भा. माडखोलकर महाविद्यालय,  दि न्यू इंग्लिश स्कूल व न. भु. पाटील ज्युनि. कॉलेज चंदगडचा सर्व स्टाफ व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सुत्रसंचालन प्रा. ए. डी. कांबळे यांनी केले. आभार प्रा. एस. एन. पाटील यांनी मानले.No comments:

Post a Comment