नेसरी ( एस .के. पाटील )
येथील कुमारी पूजा बाळासाहेब पाटील हिला एम व्ही एल अकॅडमी मुंबई या सामाजिक संस्थेच्या राज्यस्तरीय कलारत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
पूजा सध्या पुणे येथील एम आय टी कॉलेज मध्ये एमबीएचे शिक्षण घेत असून तिच्या कला क्षेत्रातील अष्टपैलू कामगिरीची मुंबई येथील सामाजिक संस्थेने नोंद घेतली. नुकताच मुंबई येथे झालेल्या ऑनलाईन समारंभात राष्ट्रीय कीर्तनकार ह.भ. प. केशवजी महाराज यांच्या हस्ते पूजाला मानाचा फेटा, चषक व प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आले.
तीने गतवर्षात नृत्य, एकपात्री भूमिका, चित्रकला आदी काल क्षेत्रात विशेष प्राविण्य मिळवलेल्या कलेची नोंद सदर संस्थेने घेतली होती.
दरम्यान लोकमतचे संपादक वसंतराव भोसले यांच्यासह स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे सचिव अभयकुमार साळुंखे व प्राचार्या शुभांगी गावडे यांनीही पूजाचा सत्कार करून तिला कौतुकाची थाप दिली. यावेळी पूजाचे वडील बाळासाहेब पाटील, आई विमल पाटील यांच्यासमवेत नातेवाईक उपस्थित होते.
No comments:
Post a Comment