चंदगड / प्रतिनिधी
चंदगड पोलिस ठाण्याच्या नुतन पोलिस निरीक्षक पदी भैरू अंतू तळेकर रूजू झाले. काल त्यांनी चंदगड पोलिस ठाण्याचा कार्यभार स्विकारला. चंदगड पोलिस ठाण्याचा कार्यभार असणारे अशोक सातपूते हे दिर्घ रजेवर गेल्याने हे पद रिक्त झाले होते. त्याजागी श्री.तळेकर यांची नेमणूक करण्यात आली आहे.
श्री. तळेकर यानी १९वर्षे भारतीय सैन्यात अधिकारी म्हणून सेवा बजावली आहे.२००६साली त्यानी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परिक्षा देऊन ते पोलिस उपनिरीक्षक पदी उत्तीर्ण झाले .कराड,मूबई, सातारा येथे उत्कृष्ट सेवा बजावली आहे. चंदगड तालुक्यात अवैद्य धंद्याना थारा देणार नाही असे सांगून कामानिमित्त येणार्या नागरिकांनी मध्यस्थाकरवी न येता आपल्याशी थेट संपर्क साधावा असे आवाहन श्री तळेकर यांनी केले आहे.
No comments:
Post a Comment