चंदगड / प्रतिनिधी
खामदळे (ता. चंदगड) येथील शिवारात ५ दिवसापासुन टस्कर हत्तीने मुक्काम ठोकला आहे. दिवसाची विश्रांती व रात्रीचे नुकसान करणे असा या टस्कराचा दिनक्रम सूरू आहे. टस्कर हत्तीने काल खामदळे गावाचवळील शिवारात श्रीमती रुक्मिणी गणपती पाटील यांचे ऊस पिक खाऊन , तुडवुन , मोडतोड करुन नुकसान केली आहे . तसेच पोल्ट्रीच्या ३ पाण्याच्या टाक्यांची मोडतोड केली आहे .गूडोपंत पाटील यांचे ऊस पिकांचे देखील नुकसान केले आहे.टस्कर हत्तीने आक्रमकतेने रात्रीच्या वेळी लक्ष्मण गणपत पाटील यांची ३ नारळ झाडे , बाबु जोती गावडे यांची २ नारळ झाडे तसेच इतर एक शेतकऱ्यांची २ नारळ झाडे अशी ७ नारळ झाडे मोडुन नुकसान केलेल आहे .याशिवाय जागोजागी मोठी जंगली माड , केळी , मेसकाटी बांबु देखील घरा जवळ येऊन मोडले आहेत.वनक्षेत्रपाल डि.जी.राक्षे यांनी स्थळ पाहणी करूून वनरक्षक यांना नुकसानीचे पंचनामे करण्याबाबत सुचना दिल्या आहेत . टस्कर हत्तीने गेल्या आठवड्यापासुन केलेली नुकसान तसेच त्यांची गावा जवळ येऊन अक्रमकतेने पाण्याच्या टाक्यांची मोडमोड करणे , बैलगाड्या तोडणे , मोठमोठ्या झाडांची मोडतोड करणे , गावातुन जाणे या बाबीवरुन टस्कर हत्ती हा सध्या माजावर आलेली शक्यता असु शकते. असे माजावर आलेल्या हत्तींना ' मद मस्त किंवा ' मस्त हत्ती ' अस म्हणतात . मदमस्त हत्ती फारच बेभाण बनतो आणि मोठमोठे वृक्ष मुळासकट उपटुन फेकुन देतात . ' मस्त ' च्या कालावधीत हत्ती अतिशय आक्रमकतेने वावरत असुन नागरिकांना अशा वेळी हत्ती जवळ जाऊ नये . त्यांचे अंगावर दगड फेकणे , फटाके टाकणे अशा प्रकारची कृत्य करु नये असे वनविभागाने आवााहन केले आहे . शेत शिवारातील ऊस पिकांची तोड होऊन ऊस पिके संपल्यामुळे टस्कर हत्ती घराजवळ येऊन केळी , नारळ , माड झाडे यांची नुकसान करत असुन नागरिकांनी घराच्या सभोवती वापरलेले जळके गाडीचे ऑईल अणि मिरचीपुड यांचे मिश्रण करुन सदरचे मिश्रण कपड्याच्या चिंध्या यांना लावुन घरांची सभोवती बांधणेबाबत ग्रामस्थांना वनक्षेत्रपाल चंदगड.डि.जी.राक्षे यांनी आवाहन केले आहे.
No comments:
Post a Comment