तूर्केवाडी येथील बॅंक ऑफ महाराष्ट्र शाखेच्या व्यवस्थापकदी सायमन मस्करेन्सह रूजू - चंदगड लाईव्ह न्युज

05 January 2021

तूर्केवाडी येथील बॅंक ऑफ महाराष्ट्र शाखेच्या व्यवस्थापकदी सायमन मस्करेन्सह रूजू

 

सायमन बस्तू मस्करेन्सह

चंदगड / प्रतिनिधी 

       बॅंक ऑफ महाराष्ट्र या बॅकेच्या  तूर्केवाडी ता चंदगड येथील शाखेच्या व्यवस्थापकपदी सायमन बस्तू मस्करेन्सह हे रूजू झाले. या शाखेत कार्यरत असणारे व्यवस्थापक नवलगूंड यानी स्वेच्छानिवृत्ती घेतल्याने हे पद रिक्त होते,त्यामुळे  

गेले चार महिने व्यवस्थापकाविना बॅकेच्या कारभार सूरू होता.या कार्यक्षेत्रातील सरपंच व शेतकरी वर्गाने या शाखेला  पूर्ण वेळ व्यवस्थापक मिळावा म्हणून क्षेत्रीय कार्यालयाकडे पत्रव्यवहार केला होता.सायमन मस्करेन्सह यांचे मुळ गाव (हेब्बाळ-जलद्याळ ता.गडहिग्लज ) हे आहे, श्री मस्करेन्सह यानी २०१० साली बॅकीग सेवेला सूरवात केली. नूल,सेनापठती कापशी,कोल्हापूर याठिकाणी सेवा बजावली आहे. शेतकरी,लघूउदयोजक व गरजूंना बॅकेच्या विविध योजनांचा लाभ देणार असल्याचे यावेळी  सांगितले.यावेळी श्री मस्करेन्सह यांचा पाटणेफाटा व्यापारी व विविध संघटनांच्या वतीने नंदकुमार ढेरे, नारायण गडकरी,  पांडूरंग बेनके, विलास कागणकर, विलास कूट्रे  यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.No comments:

Post a Comment