सौ. संजीवनी संजय चंदगडकर |
सी. एल. वृत्तसेवा, चंदगड
मौजे चंदगड येथील देसाईवाडी शिवारात शेतकऱ्यांना ये-जा करण्यासाठी सद्यस्थितीला कच्चा रस्ता आहे. शेतकऱ्यांची ऊसाची व अन्य वाहतुक करण्यासाठी पक्या रस्त्याची अंत्यत गरज आहे. देसाईवाडीच्या कार्यक्षेत्रात असंख्य शेतकरी शेती कामकाजासाठी येतात. मात्र पक्का रस्ता नसल्यामुळे अडचण होते. पावसाळ्यात तर या रस्त्यावरुन ये-जा करणे अत्यंत अडचणीचे होते. त्यामुळे हा रस्ता पक्का करणे गरजेचे आहे. गोपाळ कोकरेकर यांच्या घरापासून देसाईवाडी शिवारापर्यंत खडीकरण–डांबरीकरण रस्ता करावा व साकवाला मंजूरी द्यावी अशी मागणी चंदगड नगरपंचायतीच्या महिला व बालकल्याण सभापती सौ. संजीवनी संजय चंदगडकर यांनी चंदगड विधानसभा मतदारसंघाचे आमदार राजेश पाटील यांच्याकडे निवेदनातून केली आहे.
No comments:
Post a Comment