मलतवाडीच्या संदेशने ठोकला शड्डू आणि हादरले तीन देशांचे मल्ल - चंदगड लाईव्ह न्युज

26 January 2021

मलतवाडीच्या संदेशने ठोकला शड्डू आणि हादरले तीन देशांचे मल्ल

कुस्तीमध्ये नेपाळ येथे गोल्ड मेडल मिळवलेला संदेश


तेऊरवाडी -एस .के. पाटील

श्री राम जुनिअर कॉलेज कोवाड चा विध्यार्थी कुमार संदेश प्रकाश सरवणकर  राहणार मलतवाडी ( ता. चंदगड ) याने  पोखरा नेपाळ येथे झालेल्या आंतरराष्ट्रीय कुस्ती स्पर्धेत सुवर्णपदक मिळविले . या स्पर्धामध्ये संदेशने कजाकिस्थान, इराण व नेपाळच्या मंल्लाना चपळाईने आस्मान दाखवत सुवर्ण पदक मिळवले . त्यामुळे चंदगडच्या लाल मातीचा धुरळा  केवळ देशातच नाही तर आंतरराष्ट्रीय स्तरावर उडाला . या यशाबद्दल त्याचे अभिनंदन होत आहे.
 शहीद भगतसिंग स्पोर्ट्स असोसिएशन आयोजित इंडो - नेपाळ इंटरनॅशनल गेम्स रंगशाळा  आंतरराष्ट्रीय स्टेडिअम पोखरा नेपाळ येथे घेण्यात आले . यांच्या वतीने देशपातळीवर विभागवार स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते.त्याअंतर्गत गोवा , येथे झालेल्या राष्ट्रीय स्पर्धेत कुमार संदेश सरवणकर  याने सुवर्णपदक प्राप्त केले .त्यामुळे त्याची निवड नेपाळ येथे संपन्न झालेल्या आंतरराष्ट्रीय कुस्ती स्पर्धेसाठी झाली होती.ही स्पर्धा इंडो नेपाळ नॕशनल गेम्सने आयोजित केली.  या स्पर्धेत त्याने कजाकिस्तान, इराण व नेपाळच्या प्रतिस्पर्धी मल्लांना पराभूत करून सुवर्णपदकावर आपले नाव कोरले.  65 किलो वजनी गटातील फ्रीस्टाईल कुस्ती स्पर्धेमध्ये अंतिम सामन्यात  त्याने निकाल डावावर प्रतिस्पर्धी मल्लाला चितपट करून हे घवघवीत यश संपादन केले. मलतवाडीसारख्या एका खेड्यात शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या संदेशला गरीबीशी सामना करत कुस्तीचे वेड जपावे लागत आहे . घरची भाजी -भाकरी खाऊनच आपले नाव गोल्ड मेडलवर  लिहीले आहे .आजोबा पैलवान असल्याने त्यांचे बाळकडू संदेश ला मिळाले . वडील अहोरात्र शेतीच्या कामात . गरीबीला कवटाळून न बसता प्रकाश आपल्या मुलासाठी  शेतीमध्ये राबतो आहे . ध्यास एकच मुलाने कुस्तीमध्ये नाव कमवावे . ते  आज संदेश सार्थक करुन चंदगड मधील मलतवाडीचा  झेंडा अंतरराष्ट्रीय स्थरावर फडकविला . संदेशची निवड माऊली स्पोर्टस क्लब शिंपे , युथ नॅशनल स्पोर्ट्स कौन्सिल ऑफ इंडिया , नॅशनल गेम्स गोल्ड मेडल साठी झाली आहे . संदेशला आता आणखी भरारी घेण्यासाठी पाठबळाची गरज आहे . त्याला 
तेऊरवाडी निवृत्त जवान वस्ताद लक्ष्मण भिंगुर्डे,राष्ट्रीय प्रशिक्षक गोरक्ष सकटे यांचे मार्गदर्शन मिळाले.त्याच्या या सोनेरी यशाबद्द्ल सर्वत्र अभिनंदन केले जात आहे.

No comments:

Post a Comment