सैनिकाकडून अडकूर येथील शिवशक्ती हायस्कूलमध्ये मोफत पाठ्यपुस्तकाचे वाटप - चंदगड लाईव्ह न्युज

26 January 2021

सैनिकाकडून अडकूर येथील शिवशक्ती हायस्कूलमध्ये मोफत पाठ्यपुस्तकाचे वाटप

विद्यार्थ्याना पाठयपुस्तकाचे वाटप करताना सैनिक अरुण शिवनगेकर, सोबत प्राचार्य एस. जी. पाटील, प्रा. बिर्जे.

अडकूर / सी. एल. वृत्तसेवा

        भारतीय स्वातंत्र्याच्या ७२ व्या प्रजासत्ताक दिनानिमित्य अडकूर (ता. चंदगड) येथील श्री शिवशक्ती हायस्कूल व ज्यूनिअर कॉलेजमध्ये सैनिक अरूण शिवनगेकर यांच्या कडून विद्यार्थ्याना मोफत पाठ्यपुस्तकांचे वाटप करण्यात आले.
       प्रारंभी प्राचार्य एस. जी. पाटील यांच्या हस्ते  डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन व ध्वजावंदन करण्यात आले. यावेळी गित मंचने समूहगीत सादरीकरण केले. यानंतर शाळेचा माजी विद्यार्थी व सध्या भारतिय सैन्यदलात कार्यरत असणारा सैनिक अरूण शिवनगेकर यानी कॉलेज विद्यार्थ्याना मोफत वहया व पुस्तकांचे वाटप केले. यावेळी प्रा. रामदास बिजै, प्रा. व्ही. पी. पाटील, प्रा. एम. पी. पाटील, व्ही. एन. सुर्यवंशी, एस. के. हरेर आदि मान्यवर, आजी, माजी विद्यार्थी उपस्थित होते. प्रास्ताविक पी. के. पाटील यांनी केले. सूत्रसंचालन आर. व्ही. देसाई यांनी तर आभार एस. के. पाटील यानी मानले.

No comments:

Post a Comment