व्हाट्अपवरील चर्चेतून निघाला सकारात्मक तोडगा, अखेर हि ग्रामपंचायत झाली इतिहासात पहिल्यांदाच बिनविरोध, वाचा कोणती आहे ही ग्रामपंचायत? - चंदगड लाईव्ह न्युज

06 January 2021

व्हाट्अपवरील चर्चेतून निघाला सकारात्मक तोडगा, अखेर हि ग्रामपंचायत झाली इतिहासात पहिल्यांदाच बिनविरोध, वाचा कोणती आहे ही ग्रामपंचायत?चंदगड / प्रतिनिधी

           कानडी-पोवाचीवाडी ग्रुप ग्रामपंचायतीची यावर्षीची पंचवार्षिक निवडणूक ग्रामस्थ व तरुणांच्या पुढाकाराने इतिहासात पहिल्यांदाच बिनविरोध झाली. गावातील तसेच गावाबाहेरील तरुणांनी व्हाट्सअपसारख्या समाजमाध्यमांचा वापर करत चर्चासत्रे आयोजित करून चर्चा घडवून आणली व तरुणांच्या वतीने गावासमोर विविध अटींसह बिनविरोध निवडणुकीसाठी निवेदन मांडले. परिणामी अर्ज भरण्यापूर्वीच ग्रामस्थांची श्री रामलिंग मंदिर जीर्णोद्धार समितीच्या बैठकीमध्ये चर्चा होऊन विविध अटींमध्ये बांधील राहण्याची हमी देणाऱ्या इच्छुकांची एकमताने सदस्यपदी बिनविरोध निवड झाली.

          आजवर येथील झालेल्या निवडणुका बहुरंगी व चुरशीच्या ठरल्या होत्या. यावेळी मात्र गावकऱ्यांनी एकजूट दाखवत राजकीय महत्वाकांक्षा बाजूला ठेवून इतिहासात प्रथमच ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध करून दाखवली व एक नवा आदर्श निर्माण केला आहे. विशेष म्हणजे कोणताही सदस्य कोणत्याही राजकीय गटाशी अथवा पक्षाशी संलग्न असणार नाही आहे. त्यामुळे कानडी-पोवाचीवाडी ग्रामस्थांचे तालुक्यात विशेष कौतुक होत आहे.

                               यांना मिळाली संधी...

पुष्पलता देसाई, संगीता गुरव, शोभा कोंडुसकर, आरती कांबळे, हंबीरराव पडते, संतोष कांबळे, अशोक सुतार.No comments:

Post a Comment