पोलीस कारवाईची भीती घालून दहा हजार रुपये घेणा-या वर गुन्हा दाखल - चंदगड लाईव्ह न्युज

06 January 2021

पोलीस कारवाईची भीती घालून दहा हजार रुपये घेणा-या वर गुन्हा दाखलचंदगड / प्रतिनिधी:-

   चंदगड तालुक्यातील अलबादेवी येथील सुभाष बाळकू मुसळे या इसमाने पोलीस ठाण्यात नोंदवण्यात आलेला गुन्हा मागे घेण्यास लावतो त्यासाठी दहा हजार रुपये घेतल्याची तक्रार धोंडिबा दत्तु घोळसे रा.अलबादेवी यांनी चंदगड पोलीसात नोंद केली आहे.

        अलबादेवी या गावात गेल्या आठवड्यात बैलगाडी शर्यतीचे आयोजन करण्यात आले होते. कोणत्याही प्रकारच्या शर्यतींना सर्वोच्च न्यायालयाची मनाई असताना अलबादेवी येथील बैलगाडी शर्यतीच्या आयोजक व भाग घेणा-या वर पोलीसांनी कारवाई केली होती.पैकी धोंडिबा दत्तु घोळसे यांच्यावर शर्यती बाबत दाखल करण्यात आलेला गुन्हा मागे घेण्यास लावतो त्यासाठी सुभाष बाळकू मुसळे यांनी दहा हजार रुपये घेतल्याची तक्रार धोंडिबा घोळसे यांनी चंदगड पोलीस ठाण्यात नोंदवली आहे.चंदगड पोलीसांनी मुसळे यांच्यावर गुन्हा नोंद केला आहे पो. निरिक्षक बी. ए. तळेकर यांच्या मार्गदर्शनाखाली एस.एम.शिंदे करत आहेत.No comments:

Post a Comment