हलकर्णी महाविद्यालयात काव्यलेखन स्पर्धेचे आयोजन - चंदगड लाईव्ह न्युज

19 January 2021

हलकर्णी महाविद्यालयात काव्यलेखन स्पर्धेचे आयोजन

 


चंदगड / प्रतिनिधी

हलकर्णी (ता. चंदगड) येथील  यशवंतराव चव्हाण महाविद्यालय व गुरुवर्य गुरुनाथ विठ्ठल पाटील कनिष्ठ महाविद्यालयात मराठी भाषा पंधरवडा दिनानिमित्त खुल्या काव्यलेखन स्पर्धा आयोजित करण्यात आल्या आहेत. 

स्पर्धेसाठी कवींनी आपली एकच स्वरचित कविता पाठवावी . कवितेला विषयाने बंधन नाही .  कविता स्वरचित असल्याचे नमूद करावे . प्रथम तीन क्रमांकांना तसेच उत्तेजनार्थ पारितोषिक विजेत्यांना सन्मानचिन्ह व ग्रंथ भेट दिली जाईल . इच्छुक कवींनी आपल्या कविता प्राचार्य यशवंतराव चव्हाण महाविद्यालय , हलकर्णी ता . चंदगड , जि . कोल्हापूर या पत्यावर पाठवाव्यात . दिनांक ०५ फेब्रुवारी २०२१ पर्यंत कवींनी  कविता पाठवावी.असे आवाहन प्राचार्य डॉ . अनिल गवळी आणि समन्वयक डॉ  चंद्रकांत पोतदार याना कळविले आहे .
No comments:

Post a Comment