संत गजानन इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांना शिक्षण पुर्ण होण्यापुर्वीच नोकरी, 124 विद्यार्थ्यांची निवड, उत्कृष्ट मानांकनामुळे गुणवत्ता सिद्ध - चंदगड लाईव्ह न्युज

19 January 2021

संत गजानन इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांना शिक्षण पुर्ण होण्यापुर्वीच नोकरी, 124 विद्यार्थ्यांची निवड, उत्कृष्ट मानांकनामुळे गुणवत्ता सिद्ध

मुबंई येथील ग्रेअटोम एडुटेच प्रा.लि. कंपनीसाठी निवड झालेले विद्यार्थी समवेत प्लेसमेंट व कंपनीचे अधिकारी.
 चंदगड / प्रतिनिधी

           महागाव (ता. गडहिंग्लज) येथील संत गजानन इंजिनिअरिंग महाविद्यालयामध्ये शैक्षणिक वर्ष 2019-20 मध्ये झालेल्या कॅम्पस मुलाखतीतून 124 विद्यार्थ्यांची राष्ट्रीय व बहुराष्ट्रीय अशा नामवंत कंपनीत सर्वाधिक वेतनावर विविध पदावर निवड झाली. तसेच यावर्षी मिळालेल्या राष्ट्रीय मुल्याकंन व प्रत्यायन परिषद (क) द्वारे मिळालेल्या मानाकंनामुळे महाविद्यालयाची गुणवत्ता सिद्ध झाल्याची माहिती प्राचार्य डॉ. संजय सावंत यानी दिली.


      पदवी अभ्यासक्रमातील अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांसाठी कॅम्पस प्लेसमेंटचे आयोजन करण्यात आले होते. तीन स्तरावर झालेल्या या निवड प्रक्रियेत प्टिड्यूड, तांत्रिक मुलाखत व एच. आर. राऊंडद्वारे निवड करण्यात आली. लाँकडाऊनच्या काळातही
ऑनलाईन प्रोसेस करुन निवड करण्यात आली. तसेच महाविद्यालयाने  प्लेसमेंट, संशोधन व माहिती देवाणघेवाणासाठी कंपनी शासकीय महाविद्यालयाशी सामंज्यस्य करार केला आहे. या महाविद्यालयात गुणवत्तापुर्ण अभियंता तयार होत असल्याने नामवंत कंपनीही येथे मुलाखतीचे आयोजन करण्यास पसंती देत आहेत. नुकताच मिळालेल्या `क`  मानाकंन व प्लेसमेंटमुळे महाविद्यालयात प्रवेशासाठी विद्यार्थ्यांचा कल अधिक आहे. कंपनी थेट महाविद्यालयाशी संपर्क साधून नोकरीची संधी उपलब्ध करुन देत असल्याने याचा फायदा येथील विद्यार्थ्यांना होत असल्याने आनंदाचे वातावरण आहे. याकामी प्लेसमेंट अधिकारी प्रा. संतोष गुरव, प्रा. सिदगोंडा जबडे यांचे अधिक मार्गदर्शन मिळत असल्याचे प्राचार्य डॉ. सावंत यानी सांगितले.No comments:

Post a Comment