मनुष्य निस्वार्थी कर्माद्वारे भाग्यशाली बनतो - संध्या बहेनजी, नेसरीत ब्रम्हाकुमारी ईश्वरीय विद्यालयातर्फे पत्रकारांचा सन्मान - चंदगड लाईव्ह न्युज

19 January 2021

मनुष्य निस्वार्थी कर्माद्वारे भाग्यशाली बनतो - संध्या बहेनजी, नेसरीत ब्रम्हाकुमारी ईश्वरीय विद्यालयातर्फे पत्रकारांचा सन्मान

ब्रम्हाकुमारी ईश्वरीय विद्यालयतर्फे पत्रकार बांधवांच्या सत्कार प्रसंगी संध्या बहेनजी, माधुरी बहेनजी, सुरभी बहेनजी व पत्रकार

नेसरी  - सी. एल. वृत्तसेवा

          मनुष्य हा आपल्या निस्वार्थी कर्माद्वारे भाग्यशाली बनतो, असे प्रतिपादन प्रजापीता ब्रम्हाकुमारी ईश्वरीय विद्यालयाच्या मार्गदर्शिका संध्या बहेनजी यांनी केले. येथील ब्राह्माकुमारी ईश्वरीय विद्यालय केंद्रातर्फे आयोजित पत्रकार सन्मान व हळदी- कुंकू अशा संयुक्त कार्यक्रमात बोलत होत्या. 
         संध्या बहेनजी पुढे बोलताना म्हणाल्या, ``मनुष्याचे जीवन समृद्ध होण्यासाठी स्वताच्या आत्म्याची ओळख असणे गरजेची आहे. धकाधकीच्या जीवनात तणामुक्तीसाठी आध्यात्मिक ज्ञान असणे काळची गरज आहे. प्रजापीता ब्रम्हाबाबांच्या जीवनातील अनेक  चमत्कारी गोष्टी , त्यांनी केलेल्या ईश्वरीय कार्या  याबाबत सखोल मार्गदर्शन करून  तन-मन-धन ईश्वरीय कार्याला अर्पण केले. यासाठी परमपीता शिवप्रमात्मा यांनी  त्याना साद दिली. वयाच्या साठीनंतरही शांतीचे कार्य देशविदेशात जोमाने पोहचविले. पत्रकार बांधव समाज परिवर्तन घडविण्याचे अनमोल कार्य करतात. पत्रकार समाजाचा आरसा असून समाजसेवा निस्वार्थी करतात. त्यामूळे तेच खरे सत्काराला पात्र आहेत. यावेळी  सुरभी बहेनजी यांचे  हळदी-कुंकू सौभाग्यवतीचे लेणं व त्याचे धार्मिक महत्त्व या विषयावर सखोल मार्गदर्शन झाले. विजय गुरबे यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी पत्रकार श्रीपाद स्वामी, सदानंद पाटील, विजय कांबळे, संजय पाटील, विनायक पाटील, दिनकर पाटील, अर्जुन भिंगुडे, पी. व्ही. चौगुले, गणेश बुरूड, रमेश भोसले यांचा शाल, श्रीफळ व ईश्वरी संदेश देणारी फोटो व पुस्तकं देवून सन्मान झाला. 
          नेसरी केंद्र संचालिका माधुरी बहेनजी यांनी स्वागत व प्रास्ताविकात विद्यालयाचे कार्य विशद केले. नेसरी विभाग पत्रकार संघाचे अध्यक्ष रविंद्र हिडदुगी यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला. यावेळी कविता गुरबे, अरूणा साखरे, अंजली मठपती, संध्या जोशी, निवेदिता बहेनजी, सविता बहेनजी, मोहन पाटील, सुमन गवेकर, शिलाताई, गव्हाळे, विजयमाला वांजोळी, वर्षा हिडदुगी, अर्जुन कुंभार आदी उपस्थित होते. पत्रकार ना. सी. घोलप यांनी आभार मानले. 


No comments:

Post a Comment