कोवाड येथे नवीन रुग्णवाहिकेचा लोकार्पण सोहळा - चंदगड लाईव्ह न्युज

26 January 2021

कोवाड येथे नवीन रुग्णवाहिकेचा लोकार्पण सोहळा


कोवाड येथे रुग्णवाहिकेचे लोकार्पण करताना जि.प. सदस्य कल्लाप्पा भोगण व इतर मान्यवर


कोवाड / सी. एल. वृत्तसेवा

         प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून कोवाड प्रा. आ. केंद्रासाठी मिळालेल्या नवीन रुग्णवाहिकेचे उद्घाटन व लोकार्पण सोहळा आज कोवाड (ता. चंदगड) येथे पार पडला. जि. प. स्थायी समिती सदस्य कल्लापाण्णा भोगण यांचे हस्ते या रुग्णवाहिकेचे उद्घाटन झाले.
         महाराष्ट्र शासन आणि जिल्हा परिषदेच्या माध्यमातून जिल्ह्यासाठी नवीन 39 रुग्णवाहिका देण्यात आल्या आहेत.  त्यातील पाच चंदगड तालुक्यासाठी मिळाल्या आहेत. त्यापैकी माणगाव जि. प. मतदारसंघात तीन रुग्णवाहिका मिळाल्याची माहिती यावेळी जि .प सदस्य कल्लापाण्णा भोगण यांनी दिली.
         कोवाड प्रा आ केंद्राची अद्ययावत इमारत, येथे सेवा देणारे डाॅक्टर्स व कर्मचारी आणि अजून एका रुग्णवाहिकेची त्यात पडलेली भर यामुळे नागरिकांतून समाधान व्यक्त करण्यात येत आहे. यावेळी आजी-माजी सरपंच, उपसरपंच, सदस्य व प्रा आ केंद्राचे कर्मचारी, नुतन सदस्य आणि नागरिक उपस्थित होते.No comments:

Post a Comment