कोवाड येथे ७२ वा प्रजासत्ताक दिन उत्साहात संपन्न - चंदगड लाईव्ह न्युज

26 January 2021

कोवाड येथे ७२ वा प्रजासत्ताक दिन उत्साहात संपन्न

 

कोवाड (ता. चंदगड) येथील ग्रामपंचायतीमध्ये प्रजासत्ताक दिन साजरा झाला. 

कोवाड : सी एल वृत्तसेवा 

        कोवाड (ता. चंदगड) येथे ७२ वा प्रजासत्ताक दिन उत्साहात संपन्न झाला. ग्रामपंचायत कोवाड येथे प्रशासक बी एम कांबळे यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले. स्वागत ग्रामसेवक जी एल पाटील यांनी केले. प्रास्ताविक व सूत्रसंचालन केंद्र मुख्याध्यापक श्रीकांत पाटील यांनी केले. यावेळी जि प सदस्य कल्लाप्पाण्णा भोगण, वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रसन्न चौगुले, तलाठी दीपक कांबळे, आजी-माजी सरपंच, सदस्य, केंद्र शाळा व आरोग्य केंद्र स्टाफ अंगणवाडी सेविका आशा स्वयंसेविका व्यापारी बंधू व नागरिक उपस्थित होते. 

         केंद्रीय प्राथमिक शाळेत केंद्र मुख्याध्यापक श्रीकांत वैजनाथ पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले. व्यवस्थापन समिती अध्यक्ष रामा यादव यांनी ध्वज पूजन केले. स्वागत गणपती लोहार यांनी व प्रास्ताविक कविता पाटील यांनी केले. यावेळी श्रीकांत आप्पाजी पाटील, मयुर हजारे, समिया बाडकर सर्व शिक्षिका, अंगणवाडी सेविका, मदतनीस आदींची उपस्थिती होती. 

                                    कोवाड महाविद्यालय

         सर्वोदय शिक्षण संस्थेचे अध्यक्ष डॉ ए एस जांभळे यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले. यावेळी प्राचार्य व्ही आर पाटील, संस्था सचिव एम व्ही पाटील, बी के. पाटील, गुंडू सावंत, एम.जे. पाटील, आप्पा वांद्रे, याकूब मुल्ला आदी संचालक उपस्थित होते. स्वागत प्राचार्य व्ही आर पाटील यांनी केले. प्रस्ताविक प्रा. दीपक पाटील यांनी केले. प्रा आर टी पाटील यांनी आभार मानले.

           श्री राम विद्यालय व व्ही पी देसाई ज्युनिअर कॉलेज येथे संस्था उपाध्यक्ष अशोकराव देसाई यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले. स्वागत व प्रास्ताविक प्राचार्य वाय व्ही कांबळे यांनी केले. यावेळी सर्व अध्यापक, विद्यार्थी यांची उपस्थिती होती.

         स्वामी विवेकानंद इंग्लिश मीडियम स्कूल येथे एन एस पाटील (कडलगे) यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले. स्वागत मुख्याध्यापक श्रीकांत सुळेभावकर यांनी केले. यावेळी व्ही आर पाटील, मिलिंद पाटील, डॉ. अर्चना पाटील, संदीप भोगण, अनिल बाचुळकर सर्व शिक्षक व विद्यार्थ्यांची उपस्थिती होती. आभार संस्थाध्यक्ष डॉ. प्रविण पाटील यांनी मानले.



No comments:

Post a Comment