चंदगडची गानकोकीळा सानियाचा गायन स्पर्धेत भारतात तृतीय क्रमांक, सह्याद्रीच्या स्वरलहरींनी बहरला दिल्ली दरबार - चंदगड लाईव्ह न्युज

29 January 2021

चंदगडची गानकोकीळा सानियाचा गायन स्पर्धेत भारतात तृतीय क्रमांक, सह्याद्रीच्या स्वरलहरींनी बहरला दिल्ली दरबार

देशपातळीवरील शास्त्रीय गायन स्पर्धेत तृतिय क्रमांक प्राप्त सानिया मुंगारे

                          
तेऊरवाडी - एस. के. पाटील 

         माझ्या स्वरांनी गावी,
                          माझ्या गावाचीच गाणी,
         शब्दांशब्दांतूनी वहावे,
                            ताम्रपणीचेचं पाणी
      हे स्वप्न उराशी बाळगत गाण्यांच्या दुनियेतील प्रवास करून गायन स्पर्धेत  भारत देशात तिसरा क्रमांक मिळवलेल्या शिवनगे (ता. चंदगड) येथील सानिया मुंगारे  खरच कौतुकास पात्र आहे.

     सानियाची शिवनगेच्या गल्लीपासून  ते दिल्लीपर्यंतचा प्रवास खरचं  थक्क करणारा आहे. नव्हे आजच्या टिव्ही आणि मोबाईलमध्ये स्वतःला गाडून घेणाऱ्या मुलांसाठी आदर्शवत आहे. ताम्रपर्णी विद्यालय, शिवणगे  इ.१०वीच्या परीक्षेला सामोरे जाताना अभ्यास आणि गाणं यांचा छान मेळ सानियाने जमवला आहे.
   चंदगडचे गायन क्षेत्रातील नाव स्वर्गीय स्वरमाधूर्याचा मूर्तीमंत अवतार असणाऱ्या सानियाला प्रभात समयीची कोवळी किरणे, दवबिंदूंनी भिजलेल्या शाईने कमल तंतूच्या लेखनीने आणि वायू लहरीच्या हलक्या हाताने फुलपाखराच्या पंखावर लिहिलेले मानपत्र गुलाब फुलाच्या करंडकातुन तीला अर्पण करायला हवं.
       चंदगड म्हणजे मागास भाग हा शिक्का पुसून एक नवी ओळख उभ्या महाराष्ट्राला सानियाने करून दिली. खरं तर चंदगड म्हणजे चंदनासारखी दरवळणारी, आपल्या किर्तीचा सुगंध पसरणारी माणसं. सानिया हे त स्वरांनी सिद्ध करून दाखवलं.
          चंदगड नवरत्नांची खाण, चंदगड माणूसकीची जाण
संपूर्ण भारतातून शास्त्रीय गायन स्पर्धेत तृतीय क्रमांक पटकाविला त्याबद्दल सानियाला ज्यांनी  या क्षेत्रात संधी दिली त्या   आईवडील,  गुरुवर्य हे सर्वजनच  अभिनंदनास पात्र आहेत.
               सानियाने वयाच्या १२ व्या वर्षी गडहिंग्लजला मच्छींद्र 
बुआ यांच्याकडे शाश्त्रीय गायनास सुरवात केली. यानंतर विविध स्पर्धात सहभाग घेत  गायनामध्ये हजारो नंबर मिळवले .यानंतर तीने मागे वळून पाहिलेच नाही. शाळा सांभाळतच  गायन क्षेत्रातील यशाची शिखरे पादाक्रांत करत शिवनगे ते थेट दिल्ली पर्यत मजल मारली. केंद्र शासनामार्फत घेण्यात आलेल्या शास्त्रीय गायन स्पधैत जिल्हास्तर, राज्यस्तर प्रथम तर देशपातळीवर तृतिय क्रमांक मिळवलेल्या सानियाचे सर्वत्र  कौतुक होत आहे.

No comments:

Post a Comment