धनंजय विद्यालयातील जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धेत विविध गटात देसाई, मुल्ला व पालकर अव्वल - चंदगड लाईव्ह न्युज

29 January 2021

धनंजय विद्यालयातील जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धेत विविध गटात देसाई, मुल्ला व पालकर अव्वल

खुल्या गटात जिल्हास्तरीय प्रथम क्रमांक मिळवलेल्या सरिता देसाई हिचा सत्कार करताना ॲड.संतोष मळवीकर, सौ. मळविकर  प्राचार्य आर. आय. पाटील, मुख्याध्यापक श्री. देवरमणी व मुख्याध्यापक श्री. भोगुलकर व बापू शिरगांवकर.

चंदगड / प्रतिनिधी

      नागनवाडी (ता. चंदगड) येथे धनंजय विद्यालयामध्ये घेण्यात आलेल्या जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धा उत्साहात पार पडल्या. स्पर्धेचे उद्घाटन ॲड. संतोष मळवीकर व गव्हर्मेंट कॉन्ट्रॅक्टर विलास पाटील यांनी केले.

       तीन गटात विभागल्या गेलेल्या स्पर्धेमध्ये खुल्या गटाततून सरिता देसाई हिने प्रथम क्रमांक, द्वितीय क्रमांक सोनल तारीहाळकर व तृतीय क्रमांक रायमन मंत्रे तसेच उत्तेजनार्थ संकेत पाटील यांनी पटकावला.

      मोठ्या गटात प्रथम क्रमांक जिया मुल्‍ला बाळासाहेब, द्वितीय क्रमांक अस्मिता माडखोलकर, तृतीय क्रमांक वेदांत विष्णू गावडे तर उत्तेजनार्थ अनुराधा शिरगांवकर यांनी मिळवला.

       लहान गटात प्रथम क्रमांक श्रावणी पालकर, द्वितीय क्रमांक तेजस्विनी गावडे, तृतीय क्रमांक हरीश पाटील, उत्तेजनार्थ वैष्णवी औंधकर या विद्यार्थ्यांनी लहान गटांमध्ये क्रमांक पटकावले.

        मोठ्या प्रमाणात जिल्हास्तरीय झालेल्या वकृत्व स्पर्धेचे बक्षीस वितरण  र. भा. माडखोलकर ज्युनिअर कॉलेजचे प्राचार्य आर. आय. पाटील, संजय गांधी विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री. भोगुलकर, धनंजय विद्यालयाचे  मुख्याध्यापक श्री. देवरमणी यांच्या हस्ते शिल्ड व प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आले. स्पर्धेसाठी परीक्षक म्हणून  प्राध्यापक सुहास कुलकर्णी, दयानंद सुतार, विश्वास पाटील व शोभा पाटील यांनी काम पाहिले.  यावेळी उपस्थित एच. आय. पावस्कर, एस. जे. पाटील, पी. एन. चव्हाण, बापू शिरगांवकर, शाहू पाटील,  अनिल गावडे हजर होते. प्रास्ताविक विनया गावडे तर आभार संतोष सुतार यांनी मानले.




No comments:

Post a Comment