![]() |
बी. ए. तळेकर |
चंदगड : सी. एल. वृत्तसेवा
उद्या दिनांक 15 जानेवारी रोजी तालुक्यातील विविध ग्रामपंचायतींसाठी मतदान होणार आहे. भारतीय राज्यघटना, कायदे व लोकशाही ही जगासाठी आदर्श आहे. देशातील प्रत्येक जबाबदार नागरिकाने याचे पालन करणे गरजेचे आहे. त्यादृष्टीने पोलीस ठाणे चंदगड यांच्यावतीने नूतन पोलीस निरीक्षक बी ए तळेकर यांनी ग्रामपंचायत निवडणुकीसाठी खालील मुद्द्यांच्या आधारे आचारसंहितेचे पालन करण्याचे आवाहन केले आहे.
मतदान केंद्रापासून १०० मीटर अंतराच्या आत असलेल्या निवास्थान, दुकान, कार्यालय यामध्ये कोणी थांबणार नाही किंवा रेंगाळणार नाही याची खबरदारी घ्यावी. मतदानाच्या दिवशी राजकीय पक्ष, उमेदवार किंवा त्यांचे समर्थक यांनी कोणत्याही मतदाराला ज्ञान करणे व इतर सुविधा पुरवू नये किंवा आश्रय देऊ नये. मतदान सुरू झाल्यापासून संपे पर्यंत शंभर मीटरच्या परिसरात कोणतेही गाणे किंवा वाद्य वाजवू नये. या काळात कोणीही निवासस्थान, दुकान, कार्यालय या ठिकाणी मतदारांना विनाकारण थांबवून ठेवलेस आचारसंहिता भंगाची कारवाई केली जाईल. कोणीही आदर्श आचारसंहिता भंग केल्याचे निदर्शनास आल्यास चंदगड पोलीस ठाण्याशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
No comments:
Post a Comment