कोवाड केंद्रावर सकाळच्या महिला वर्गाची मतदानासाठी रांग लागली होती. |
चंदगड / प्रतिनिधी
चंदगड तालुक्यातील 33 ग्रामपंचयतीच्या ग्रामपंचायतीसाठी आज शांततेत मतदान झाले. आज झालेल्या निवडणूकीत शांततेत ८२.९४ टक्के मतदान झाले. तर एकूण ४८ हजार ८८९ मतदारंपैकी ४० हजार ५५० मतदारांनी आपला हक्क बजावला.
सकाळपासूनच मतदारानी मतदानासाठी केंद्रावर मोठ- मोठ्या रांगा लावल्या. साम-दाम-दंड-भेद यांचा वापर करत गावागावतील पुढऱ्यांनी मोठ्या हौशेने मतदारांना केंद्रापर्यत पोहचवले. त्यातून मोठ्या प्रमाणात मतदान होण्यास मदत झाली. एकूण ४१ ग्रामपंचायतीचा निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला होता. त्यापैकी धूमडेवाडी, म्हाळेवाडी, मलतवाडी, मुगळी, घुल्लेवाडी, कानडी, केरवडे, ढोलगरवाडी या आठ गावाच्या निवडणूका बिनविरोध झाल्या आहेत. उर्वरित ३३ग्रामपंचायतीसाठी आज मतदान पार पडले. प्रशासन व पोलिसांनी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत ग्रामपंचायतीसाठी कायदा व सुव्यवस्था राखत शांततेत मतदान पार पडले.
तालुक्यात एकूण ८२.९४% मतदान झाले. तर ३३ ग्रामपंचायतीत एकूण ४८ हजार ८८९ मतदारंपैकी मतदारांनी आपला हक्क बजावला. कोरोनाचा काळ असल्या कारणाने योग्य ती खबरदारी घेण्यात आली. स्क्रिनींग, सॅनिटाईज करुन करून मतदारांना केंद्रात प्रवेश देण्यात येत होता. काही ठिकाणी इर्षा, चुरस शिगेला पोहचली होती. पण आता मतदारांच्या मनातील कौल काय लागणार यासाठी सोमवारची वाट पहावी लागणार आहे.
दरम्यान आज जिल्हा पोलीस प्रमूख बलकवडे यांनी इब्राहिमपूर, पूंद्रा, कानूर येथे, डिवायएसपी गणेश इंगळे यांनी दाटे, हलकर्णी, तावरेवाडी येथील मतदान केंद्राना भेटी दिल्या. निवडणुक निरीक्षक भगवान कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली तहसिलदार विनोद रणवरे यांनी निवडणुक प्रक्रिया पाडली. पोलिस निरीक्षक भैरू अंतू तळेकर, पोउप निरिक्षक दिलीप पवार यांनी चोख पोलिस बंदोबस्त ठेवला होता.
No comments:
Post a Comment