चंदगडमध्ये भारतीय स्टेट बँक ऑफ इंडियाची शाखा लवकरच - आमदार राजेश पाटील - चंदगड लाईव्ह न्युज

16 January 2021

चंदगडमध्ये भारतीय स्टेट बँक ऑफ इंडियाची शाखा लवकरच - आमदार राजेश पाटील

चंदगड येथे स्टेट बँक ऑफ इंडियाची शाखा चालू करण्याचे निवेदन रिजनल मॅनेजर श्री. चौधरी याना देताना आमदार राजेश पाटील.

चंदगड / सी. एल. वृत्तसेवा

       चंदगड येथे भारतीय स्टेट बँक ऑफ इंडियाची शाखा नसल्याने शेतकरी वर्गाची मोठी अडचण निर्माण होत होती. शेतकऱ्यांची अडचण लक्षात घेऊन चंदगड येथे या बँकेची शाखा सुरू करण्याची विनंती बँक प्रशासनाकडे केली असल्याची माहिती आमदार राजेश पाटील यांनी दिली.
        राष्ट्रीयकृत बँकेची शाखा चंदगड शहरामध्ये व्हावी, याकरिता स्टेट बँक ऑफ इंडियाचे रिजनल मॅनेजर श्री. चौधरी यांची बँकेच्या रिजनल कार्यालयामध्ये समक्ष भेट घेऊन त्यांना याबाबतची माहिती दिली. याबाबत लवकरच चंदगड शहरांमध्ये स्टेट बँक ऑफ इंडियाची शाखा सुरू करत असल्याची ग्वाही  श्री. चौधरी यांनी दिली. यामुळे शासनाच्या विविध योजना व त्याआधारे मिळणारे अनुदान हे शेतकऱ्यांना व स्थानिक नागरिकांना मिळण्यास मदत होणार असल्याने चंदगड व परिसरातील नागरिकांची याद्वारे चांगली सोय होणार आहे.
       चंदगड शहरामध्ये सद्यस्थितीला बाजारपेठेमध्ये भारतीय स्टेट बँकेचे ग्राहक सेवा केंद्र गेल्या सहा वर्षापासून कार्यरत आहे. ग्राहक सेवा केंद्रातील व्यवहाराला मर्यादा असल्यामुळे मोठे व्यवहार असलेल्या ग्राहकांची अडचण होत होती. चंदगड शहरामध्ये बँकेशी शाखा होणार असल्याने सर्वच ग्राहकांची सोय होणार आहे.


No comments:

Post a Comment