गणेशवाडी येथे तलाठ्यावर जीवघेणा हल्ला, चंदगड पोलिसांत गुन्हा नोंद - चंदगड लाईव्ह न्युज

20 January 2021

गणेशवाडी येथे तलाठ्यावर जीवघेणा हल्ला, चंदगड पोलिसांत गुन्हा नोंद

  

चंदगड / प्रतिनिधी

         राजगोळी पैकी गणेशवाडी (ता. चंदगड) येथे अवैधरित्या गौण खनिज उत्खनन करणाऱ्यांना रोखण्यास गेलेल्या गावकामगार तलाठी अक्षय अनिल कोळी (वय २५, मूळ गाव धरणगुत्ती, ता. शिरोळ. सध्या रा. राजगोळी, ता. चंदगड) यांच्यावर पोकलॅन मशीनच्या सहाय्याने जीवघेणा हल्ला झाला  या प्रकरणी चौघा अनोळखीं विरोधात येथील पोलिसांत तक्रार नोंदवली आहे. शनिवारी  सायंकाळी ही घटना घडली. 

     कोळी राजगोळीचे तलाठी आहेत. त्याच हद्दीतील गणेशवाडी येथे अवैधरित्या गौणखनीज उत्खननसुरू असल्याचे समजल्यावर सहकारी दीपक कांबळे यांच्यासह ते घटनास्थळी गेले.  त्यांनी दुरूनच आवाज देत काम बंद करण्याची सूचना केली. परंतु त्याने काम सुरूच ठेवले. कोळी मशीनसमोर जाऊन काम बंद करण्यास सांगत असताना पोकलॅन चालकाने मशीनचे फावडे जोराने त्यांच्या दिशेने फिरवले. कोळी यांनी तत्काळ उडी मारून बाजूला जात हल्ला वाचवला. त्याच वेळी तिथे उभे असलेल्या तिघांनी त्याला सोडू नका, मारा त्याला' अशी पोकलॅन चालकास चिथावणी देऊ लागले. कांबळे यांनी पोकलॅन थांबवण्यासाठी मशीनवर चढण्याचा प्रयत्न केला. मात्र पोकलॅन चालक अंधाराचा फायदा घेऊन फरारी झाला.  No comments:

Post a Comment