उचगाव साहित्य अकादमीतर्फे साहित्य संमेलनासाठी कवींना नावनोंदणीसाठी आवाहन - चंदगड लाईव्ह न्युज

20 January 2021

उचगाव साहित्य अकादमीतर्फे साहित्य संमेलनासाठी कवींना नावनोंदणीसाठी आवाहन


चंदगड / प्रतिनिधी

          उचगाव (ता जि बेळगाव) येथे २४जानेवारी रोजी होणार्या २०व्या  मराठी  साहित्य संमेलनात होणाऱ्या कवी संमेलनात सहभागी होऊ इच्छिना-या कवीनी नावनोंदणी करावी असे आवाहन  उचगाव मराठी साहित्य अकादमीचे अध्यक्ष कृष्णाजी कदम-पाटील व सचिव एन ओ चौगुले यांनी केले आहे. या संमेलनातील तिसऱ्या सत्रामध्ये स्थानिक कवींना वाव देण्यासाठी यावर्षी सर्व कवींना आवाहन करण्यात आले आहे. 

कवी संमेलनामध्ये भाग घेणाऱ्या कवींनी उचगाव मराठी साहित्य अकादमीचे सेक्रेटरी एन. ओ. चौगुले यांच्याकडे पोस्ट अथवा प्रत्यक्ष शनिवार दि. २३ जानेवारीपर्यंत प्रत आणून द्यावी, या कवी संमेलनामध्ये निवडक कवींची निवड करून त्यांना कवी संमेलनात कविता सादर करण्याची संधी देण्यात येणार आहे. कवींनी एन. ओ. चौगुले, सेक्रेटरी उचगाव मराठी साहित्य अकादमी, उचगाव (ता. जि. बेळगाव -५९११२८) मो. ९८४५९०८०८२ या पत्त्यावर पोस्टाने कविता पाठवावी, असे कळविण्यात आले आहे.No comments:

Post a Comment