पार्ले धगरवाडा येथे बिबटयाच्या हल्ल्यात म्हैस गंभीर जखमी - चंदगड लाईव्ह न्युज

20 January 2021

पार्ले धगरवाडा येथे बिबटयाच्या हल्ल्यात म्हैस गंभीर जखमी


चंदगड / प्रतिनिधी

          पार्ले (ता. चंदगड) येथील धूळू बमू फोंडे यांच्या शेतात चरत असलेल्या दोन म्हैशीवर बिबट्या ने हल्ला करून गंभीर जखमी केले आहे.काल सांयकाळी सहा वाजण्याच्या सुमारास धनगरवाडया जवळील मालकी क्षेत्रात  सुमारास चरत असलेल्या पाळीव जनावरावर  बिबटयाने हल्ला केला. यामध्ये पोलिस पाटील सखाराम फोंडे यांची गाय किरकोळ जखमी झाली आहे. 

      श्री.फोंडे यांच्या आईने आरडा ओरड केलेनंतर बिबटया पळुन गेला. वनानजिकच्या शेतकरी यांनी पाळीव प्राण्यांची काळजी घ्यावी. तसेच शेळया, गाय, म्हैस वनक्षेत्रात चारायला सोडु नये. व जरुरती दक्षता घ्यावी असे आवाहन पाटणे वनक्षेत्रपाल दत्ता पाटील यांनी केले आहे. गेल्या आठवडयात बांद्राई धनगरवाडा येथेही बिबटयाने एका म्हैशीला जखमी केलेले आहे. वाळलेले गवत व कठीन जमीन यामुळे बिबटयाचे पायाचे ठसे मिळुन आले नाहीत. वनपाल बी आर भांडकोळी, वनरक्षक गणेश बोगरे, वनमजुर तुकाराम गुरव, चंद्रकांत बांदेकर,अर्जुन पाटील, विश्वनाथ नार्वेकर यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामे केले आहेत.No comments:

Post a Comment