नांदवडे येथे माऊली परिवर्तन ग्रामविकास आघाडीने सहा जागा जिंकून ग्रामपंचायतीमध्ये घडविले दहा वर्षानंतर सत्तांतर, सातेरी विकास आघाडीला तीन जागा - चंदगड लाईव्ह न्युज

20 January 2021

नांदवडे येथे माऊली परिवर्तन ग्रामविकास आघाडीने सहा जागा जिंकून ग्रामपंचायतीमध्ये घडविले दहा वर्षानंतर सत्तांतर, सातेरी विकास आघाडीला तीन जागा

 

        विद्यानंद सुतार परशराम फडके अश्विनी गावडे                   नारायण पाटील   अस्मिता पाटील    संजीवनी सुतार                        संगीता गावडे    संजीवनी पेडणेकर राजेंद्र कांबळे


चंदगड / प्रतिनिधी

        संपूर्ण तालूक्याचे  लक्ष लागलेल्या नांदवडे-शेवाळे (ता. चंदगड) येथील ग्रुप ग्रामपंचायतीमध्ये माऊली परिवर्तन ग्राम विकास पॅनेलने ९ पैकी ४ जागा जिंकून व (दोन बिनविरोध) अशा ६ जागेवर बहुमत मिळवून ॲड. संतोष मळवीकर यांची दहा वर्षाची सत्ता उलथून टाकत ग्रामपंचायतीमध्ये सत्तांतर घडविले.

      दहा वर्षांपूर्वी सत्तेत आलेल्या ॲड. संतोष मळवीकर यांच्या नांदवडे येथील ग्रामपंचायतमधील सत्तेला त्यांच्याच साथीदारांनी सुरुंग लावला. तत्कालीन पुढाऱ्यांच्या कारभाराला कंटाळून ॲड. मळविकर यांनी दहा वर्षापूर्वी गावातील नाराज गटातील कार्यकर्ते, युवक व जाणकारांची मोट बांधून गावची सत्ता हस्तगत केली होती.

        त्यावेळी त्यांना सरपंचपदाची संधी मिळाली होती. त्यानंतर झालेल्या पंचवार्षिक निवडणुकीत सरपंच निवडीतही ॲड. मळविकर यांच्या पत्नी सौ. संज्योती मळविकर यांनी बाजी मारली होती. दहा वर्षे ॲड. मळविकर यांनी गावचे राजकारण केले. गावातील तरुणांनी गावाच्या विकासात मदत केली. मात्र त्यांना मदत केलेल्या परशराम पवार, संपत पेडणेकर, नामदेव गावडे, विठ्ठल गावडे, दयानंद गावडे, शिवाजी गावडे, सुनील शिंदे अशा अनेक तरुणांनी मळवीकर यांची साथ सोडली आणि गट-तट न करता माऊली परिवर्तन विकास आघाडीची स्थापना केली. या आघाडीच्या माध्यमातून ६ जागा जिंकून मळविकर यांची दहा वर्षाची सत्ता उलथावून टाकून सत्तांतर केले.

       नांदवडे व शेवाळे या दोन गावांची ग्रुप ग्रामपंचायत आहे. नांदवडे येथे ६ जागांसाठी आणि शेवाळे येथे ३ जागांसाठी निवडणूक लागली होती. तरुणांच्या माऊली विकास परिवर्तन आघाडीकडून नारायण संभाजी पाटील (510), अस्मिता सुधाकर पाटील 495), सौ. संजीवनी संपत पेडणेकर (425), संगीता शिवाजी गावडे (420) विजयी झाले. संजीवनी सुरेश सुतार व राजेंद्र वैजू कांबळे हे दोन उमेदवार बिनविरोध निवडून आले होते. शेवाळे येथील तिन्ही जागांवर मळवीकर पॅनेलचे उमेदवार विजयी झाले. यामध्ये परशराम फडके (335), विद्यानंद सुतार (363), अश्विनी गावडे (351) मते घेवून विजयी झाले. नांदवडेतील सहाही जागांवर अड. मळविकर यांना अपयश आले. मात्र संपुर्ण गावाच्या विरोधात ॲड. मळविकर यांनी श्री माऊली सातेरी विकास आघाडीच्या माध्यमातून आव्हान निर्माण केले होते. त्यामुळे या निवडणुकीकडे संपुर्ण तालुक्याचे लक्ष लागले होते.

 

प्रभाग क्रं. १

विद्यानंद पुंडलिक सुतार   363 (विजयी, श्री माऊली सातेरी विकास आघाडी)

पांडुरंग गुंडू सुतार        204

परशराम म्हातारु फडके    335 (विजयी, श्री माऊली सातेरी विकास आघाडी)

संभाजी सोमाना गावडे     233

अश्विनी अशोक गावडे     351 (विजयी, श्री माऊली सातेरी विकास आघाडी)

पुजा राजाराम गावडे 220

 

प्रभाग क्र. २

नारायण संभाजी पाटील     510 (विजयी, माऊली परिवर्तन विकास आघाडी)

परशराम गोपाळ मळविकर  128

अस्मिता सुधाकर पाटील    495 (विजयी, माऊली परिवर्तन विकास आघाडी)

पाटील संजीवनी संजय     144

संजीवनी सुरेश सुतार      (बिनविरोध, माऊली परिवर्तन विकास आघाडी)

 

प्रभाग क्रमांक ३

संगीता शिवाजी गावडे     420 (विजयी, माऊली परिवर्तन विकास आघाडी)

अस्मिता गणेश गावडे     118

संजीवनी संपत पेडणेकर    425 (विजयी, माऊली परिवर्तन विकास आघाडी)

वनिता पांडुरंग पाटील     120

राजेंद्र वैजु कांबळे        (बिनविरोध, माऊली परिवर्तन विकास आघाडी)No comments:

Post a Comment