कोवाड महाविद्यालयाला पुनर्मूल्यांकनासाठी नॅक समितीची भेट, विविध विभागांची तपासणी, माजी विद्यार्थ्यांशी संवाद - चंदगड लाईव्ह न्युज

20 January 2021

कोवाड महाविद्यालयाला पुनर्मूल्यांकनासाठी नॅक समितीची भेट, विविध विभागांची तपासणी, माजी विद्यार्थ्यांशी संवाद

कोवाड (ता. चंदगड) येथील महाविद्यालयाचया  तपासणी करताना नॅक पुनर्मुल्यांकन समिती सदस्य. सोबत कॉलेजचे कर्मचारी

कोवाड / सी. एल. वृत्तसेवा

        चंदगड तालुक्यातील सर्वोदय शिक्षण संस्थेचे कला वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय कोवाडच्या पुनर्मूल्यांकनासाठी दिनांक 18 व 19 जानेवारी 2021 या कालावधीत  बेंगलोर NAAC संस्थेकडून समितीने महाविद्यालयाला भेट देवून विविध विभागांची तपासणी केली. 
तपासणी करताना नॅक समितीतील सदस्य

      यापूर्वी या महाविद्यालयाला  `बी` प्लस प्लस हे मानांकन प्राप्त झालेले आहे.  महाविद्यालयातील तिसऱ्या मूल्यांकनासाठी  आदिकवी नन्नया विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुरेश वर्मा पेनुमत्सा (चेअरमन), डॉ. संजीत कुमार (को-ऑर्डिनेटर) गुप्ता प्रोफेसर डिपार्टमेंट ऑफ कॉमर्स दिन दयाळ उपाध्याय गोरखपुर विद्यापीठ गोरखपूर युपी. डॉ.जावेद अहमद काझी (सदस्य )ही त्रि सदसिय समिती NAAC संस्थेने गठित केली होती.या तज्ञ समितीने महाविद्यालयातील आर्ट्स, कॉमर्स आणि सायन्स आणि बी. सी. ए.व विद्याशाखाच्या पी. पी. वर विभागांचे अहवाल सर्व प्रमुखांनी समितीसमोर सादर केले गेले. तसेच  ग्रंथालय, क्रीडा, एन. एस. एस,  सर्व सायन्स विभागांच्या प्रयोगशाळा कॉम्पुटर विभाग, कामकाज  आणि सर्व विभागाचे उपक्रम तसेच प्रशासकीय कामकाजाची तपासणी केली. महाविद्यालयातील सर्व  प्राथमिक सुविधांपासून ते गुणवत्ता तपासणी करून  माजी विद्यार्थी-पालक या समाजातील विविध घटकांशी प्रत्यक्ष चर्चा केली. यापूर्वी संस्थेने पुनर्मूल्यांकनासाठी शैक्षणिक पायाभूत सुविधांची तयारी केली असल्याचे अध्यक्ष डॉ. ए. एस. जांभळे, सचिव एम. व्ही. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. व्ही. आर.  पाटील यांनी सांगितले.
          त्यासाठी संस्थेकडून विविध पातळीवर सर्वोतोपरी तयारी करण्यात आली होती. यावेळी समन्वयक आणि सर्व विद्याशाखांचे प्रमुख, सेवक, कर्मचारी, यांच्याशी समितीने चर्च्या केली असून ते आपला अहवाल सादर करणार आहेत. ही सर्व तपासणी कोविड १९ चे शासनाने निर्गमित केलेले नियमांचे पालन करून करण्यात आली आहे.



No comments:

Post a Comment