पं. स. सदस्य दयानंद काणेकर यांच्या वाढदिवसानिमित्त १११ कोव्हिड योध्दांचा सत्कार - चंदगड लाईव्ह न्युज

17 January 2021

पं. स. सदस्य दयानंद काणेकर यांच्या वाढदिवसानिमित्त १११ कोव्हिड योध्दांचा सत्कार

दयानंद काणेकर

चंदगड / प्रतिनिधी 

       चंदगड येथील सामाजिक कार्यकर्ते, सेवाभावी,निष्कलंक व उपक्रमशिल व्यक्तीमत्व, पंचायत समितीचे सदस्य व चंदगड अर्बन बॅंकेचे विद्यमान अध्यक्ष दयानंद काणेकर यांचा वाढदिवस मंगळवार दि. १९ /०१ /२०२१ रोजी पंचायत समितीमध्ये सायंकाळी पाच वाजता  विविध उपक्रमांनी साजरा करण्यात येणार आहे. 

        यानिमित्ताने कोरोना काळात उल्लेखनीय कार्य करणारे तहसिलदार, गटविकास अधिकारी, पोलिस निरीक्षक, पत्रकार, डाॅक्टर, अंगणवाडी सेविका, मदतनीस, आशा सेविका, आरोग्य सेविका व इतर क्षेत्रातील १११ मान्यवराचा सत्कार आयोजित केला आहे. या कार्यक्रमाला सर्वांनी  उपस्थित रहावे असे आवाहन सामाजिक कार्यकर्ते संजय चंदगडकर यांनी केले आहे.No comments:

Post a Comment