चंदगड तालूक्यातील सर्व ग्रामपंचायत उमेदवारांना पोलिस ठाण्यामार्फत आवाहन, काय केले आहे, आवाहन? - चंदगड लाईव्ह न्युज

17 January 2021

चंदगड तालूक्यातील सर्व ग्रामपंचायत उमेदवारांना पोलिस ठाण्यामार्फत आवाहन, काय केले आहे, आवाहन?

बी. ए. तळेकर
चंदगड / प्रतिनिधी

            चंदगड पोलीस स्टेशन हद्दीतील सर्व  ग्रामपंचायतीतील पॅनेल प्रमुख उमेदवार यांना सुचित करण्यात येते की सोमवार दिनांक १८/०१/२०२१रोजी मतमोजणी असून विजयी उमेदवार यांनी कुठल्याही प्रकारची मिरवणूक काढायची नाही. 

      सध्या कोल्हापूर जिल्ह्यात महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम ३७(१)(३) चा अंमल चालू आहे. त्यामुळे डी. जे. किंवा साऊंड सिस्टिम लावून, बँड लावून मिरवणूक काढणार नाही. तसेच पराभूत उमेदवाराच्या घरासमोर जाऊन फटाके लावणार नाही. तसेच गुलालाची उधळण करणार नाही.  मोटरसायकलचे  सायलेन्सर काढून  कर्णकर्कश आवाज करून कोणीही ही गावातून फिरणार नाही. असे वर्तन कटाक्षाने टाळावेत. असे जो वर्तन करील त्यामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास सर्वस्वी त्यांना जबाबदार धरून योग्य ती उचित कायदेशीर कारवाई करण्यात येईल. त्यासाठी सर्व उमेदवार व पॅनल प्रमुख यांना सीआरपीसी 149 प्रमाणे नोटीस देण्यात आले आहेत. तसेच पराभुत उमेदवार यांनी आपला पराभव खिलाडू वृत्तीने स्वीकारून कोणत्याही प्रकारचा खोडकरपणा न करता कायदा व सूव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही याची दक्षता घ्यावी. सर्वांनी विजय उमेदवार यांचे स्वागत करून गावचे विकास कामात मदत करावी. निवडणुकीत विजय व पराभव होत असतो. त्यामुळे त्याचा सर्वांनी आनंदाने स्वीकार करावा. गावातील सामान्य नागरिकांना त्रास होणार नाही याची दक्षता घ्यावी असे आवाहन पो. नि. बी. ए. तळेकर यांनी केले आहे.
No comments:

Post a Comment