चंदगड तालुक्यातील नागरिकांना आवाहन, निकालामुळे वाहतुक व्यवस्थेत तात्पुरता बदल, काय आहे हा बदल? - चंदगड लाईव्ह न्युज

17 January 2021

चंदगड तालुक्यातील नागरिकांना आवाहन, निकालामुळे वाहतुक व्यवस्थेत तात्पुरता बदल, काय आहे हा बदल?

बी. ए. तळेकर

चंदगड / प्रतिनिधी

          चंदगड तालुक्यातील ३३ गावच्या  ग्रामपंचायत निवडणूकीसाठी दि.१५ जानेवारी २०२१ रोजी मतदान झाले असून त्याचा निकाल उदया सोमवार दिनांक १८ जानेवारी २०२१ रोजी होणार आहे. सदरचा निकाल हा तहसील कार्यालय चंदगड येथे समजणार असून  निकाल ऐकण्यासाठी चंदगड  तालुक्यातून बरेच नागरिक उमेदवार त्यांचे प्रतिनिधी येण्याची शक्यता आहे. 

            त्यामुळे चंदगड तहसील कार्यालय येथे हे गर्दी होऊन वाहतुकीचा कोंडी आणि कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्‍न निर्माण होऊ शकतो. सबब चंदगड तहसील कार्यालय पासून १०० मीटर अंतरावर तहसील कार्यालयाकडे येणारे रोड 

१. शासकीय गोदाम मेन रोड चंदगड येथे बंद करण्यात आला आहे. 

२. चंदगड कोर्ट कडून रवळनाथ मंदिराकडे जाणार रोड चंदगडकर निवास येथे बंद करण्यात आला आहे. 

३. शिक्षक कॉलनी कडून  तहसील ऑफिस समोरील रस्ता. 

     वरील सर्व रस्ते सकाळी ८  ते दुपारी १२ वाजेपर्यंत तात्पुरत्या स्वरूपात बंद करण्यात येणार आहेत. बस मधून प्रवास करणाऱ्या नागरिकांसाठी बसचा थांबा हा ग्रामीण रुग्णांयलासमोर करण्यात आला आहे. वरील विहित वेळेत चंदगडहुन सुटणाऱ्या व बाहेरून येणाऱ्या एस. टी. बसेस ग्रामीण रुग्णालयां समोरून सुटतील. तसेच ग्रामपंचायत निवडणुकीचा निकाल ऐकण्यासाठी येणाऱ्या नागरिकांना त्यांच्या वाहनांच्या पार्किंगसाठी शासकीय गोदाम चंदगड येथे पार्किंगची व्यवस्था करण्यात आलेली आहे. याची सर्व  नागरिकांनी नोंद घेऊन सहकार्य करावे अशी विनंती पोलिस निरीक्षक बी. ए. तळेकर यांनी  केले आहे. No comments:

Post a Comment