![]() |
अडकूर पाझर तलाव कडे जाणा-या रस्त्याची दुरुस्ती करावी या मागणीचे निवेदन देताना |
चंदगड / प्रतिनिधी
चंदगड तालुक्यातील अडकूर येथील डोणी पाझर तलाव कडे जाणारा रस्ता अक्षरशः चाळण झाला आहे, जागोजागी खड्डे पडले आहेत त्यामुळे अपघातांची शक्यता निर्माण झाली आहे.तरी रस्ता होणे गरजेचे आहे. या रस्त्याच्या मागणीचे निवेदन गडहिंग्लज कृषी उत्पन्न बाजार समितीचे अध्यक्ष अभय देसाई-अडकूरकर यांच्या पुढाकाराने आमदार राजेश पाटील यांना नुकताच देण्यात आले.
यावेळी शिवराज देसाई, मोहन इंगवले, महेश रावराणे, भिमा देसाई, दत्ताजी देसाई, बबन देसाई, बाळकृष्ण देसाई, अर्जुन अपटेकर, कुंदेकर इत्यादी यावेळी उपस्थित होते.
No comments:
Post a Comment