![]() |
विनोद पाटील |
संजय पाटील /तेऊरवाडी, सी. एल. वृत्तसेवा
१९ वर्षाखालील महाराष्ट्र राज्याच्या कब्बड्डी संघाने गोवा येथे झालेल्या नॅशनल युथ स्पोर्ट इव्हेंन्ट २०२१ या स्पर्धेत सुवर्णपदक मिळवले. तर या संघातून उकृष्ठ रायडर म्हणून तेऊरवाडी (कमलवाडी) ता .चंदगड येथील विनोद यल्लाप्पा पाटील या खेळाडूलाही सुवर्ण पदकाने गौरवण्यात आले. विनोदची नेपाळ येथे होणाऱ्या इंटरनॅशनल स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
![]() |
गोवा येथे गोल्ड मेडल मिळववलेला महाराष्ट्र राज्याचा कब्बड्डी संघ |
तेऊरवाडी येथील प्राथमिक शाळा व नंतर तेऊरवाडी माध्यमिक विद्यालयामध्ये विनोदचे माध्यमिक शिक्षण झाले. या ठिकाणी मुख्याध्यापक एम. बी. पाटील व क्रीडा शिक्षक एम. ए. पाटीलचा यानी मोलाचे मार्गदर्शन केले. तर कनिष्ठ महाविद्यालयामध्थे प्रा. विनोद पाटील यांनी मार्गदर्शन केले. तो सध्या शिवराज महाविद्यालय गडहिंग्लज येथे बी. कॉम भाग एक मध्ये शिकत आहे. विनोदने धारवाड, कोल्हापुर, संकेश्वर, गोकाक आदि ठीकाणच्या कब्बड्डी स्पर्धामध्ये संघाला प्रथम क्रमांक मिळवून देण्यात सिंहाचा वाटा उचलला आहे.
![]() |
नेपाळ स्पर्धांसाठी शुभेच्छा व सत्कार करताना केदारी पाटील. |
गोवा येथे दोन दिवसा पूर्वी झालेल्या स्पर्धात आंध्र प्रदेशला फायनलमध्ये हारवत महाराष्ट्र संघाने गोल्ड मेडल मिळवले. घरची परिस्थिती अंत्यंत नाजूक व सतत शेतीकामात असूनही विनोदने नॅशनल ते थेट इंन्टरनॅशनल स्पर्धा पर्यंत मजल गाठली असल्याने त्याचे सर्वत्र कौतूक होत आहे. शेतीची कामे सांभाळत कब्बड्डीमध्ये ठसा उमटवत असणाऱ्या विनोदचा सत्कार सेवा सोसायटीचे संचालक केदारी पाटील व सौ. लिला पाटील यांनी केला. नेपाळ येथे होणाऱ्या इंटरनॅशनल स्पर्धासाठी शुभेच्छा दिल्या.
No comments:
Post a Comment