ग्रामपंचायत निवडणूक प्रचारासाठी मंत्री उदय सामंत यांची हलकर्णी येथे बुधवारी सभा - चंदगड लाईव्ह न्युज

11 January 2021

ग्रामपंचायत निवडणूक प्रचारासाठी मंत्री उदय सामंत यांची हलकर्णी येथे बुधवारी सभा

मंत्री उदय सामंत

चंदगड / प्रतिनिधी 

       हलकर्णी (ता. चंदगड) येथे महाराष्ट्र राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत हे चंदगड विधानसभा मतदार संघातील ग्रामपंचायतीच्या प्रचारासाठी बुधवार दि. 13 जानेवारी 2021 रोजी सकाळी ११ वाजता जाहीर सभा घेणार आहेत.

या सभेसाठी कोल्हापूर जिल्ह्याचे संपर्क प्रमुख अरुणभाई दुधवाडकर, खासदार संजय मंडलिक, जिल्हा प्रमुख विजय देवणे, सहसंपर्क प्रमुख प्रा. सुनिल शिंत्रे, उपजिल्हा प्रमुख प्रभाकर खांडकेर, संभाजी पाटील, माजी शिक्षण सभापती भरमाणा गावडा, माजी जि. प. सदस्य शिवाजी सावंत, सौ. संज्योती मळविकर, सौ. श्वेता नाईक, सौ. शांता जाधव, ग्राहक संरक्षण तालुका प्रमुख राजु रेडेकर, गडहिंग्लज तालुका प्रमुख दिलीप माने, चंदगड तालुका प्रमुख अशोक मनवाडकर, अनिल दळवी, आजरा तालुका प्रमुख युवराज पोवार यांच्यासह प्रमुख मार्गदर्शन करणार आहेत. शिवसैनिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन विधानसभा संघटक संग्राम कुपेकर यांनी केले आहे. 




No comments:

Post a Comment