तेऊरवाडीतील हमालाच्या मुलाने केली कमाल, नेपाळमध्ये उडवली एकच धमाल, कोण आहे हा, कोणत्या क्षेत्रात मिळविले यश? - चंदगड लाईव्ह न्युज

26 January 2021

तेऊरवाडीतील हमालाच्या मुलाने केली कमाल, नेपाळमध्ये उडवली एकच धमाल, कोण आहे हा, कोणत्या क्षेत्रात मिळविले यश?

सुवर्ण पदक विजेता विनोद पाटील 

तेऊरवाडी - एस. के. पाटील

        तेऊरवाडी - कमलवाडी (ता. चंदगड) येथील यल्लाप्पा पाटील या शेतीबरोबर हमाली करणाऱ्याचा मुलगा विनोद पाटील याने नेपाळ येथे झालेल्या आंतरराष्ट्रीय कब्बड्डी स्पर्धामध्ये चमकदार कामगीरी करत नेपाळला नमवले .आपल्या नेत्रदिपक चपळ  चढाईच्या जोरावर अनेक विदेशी मातबर संघाना धूळ चारलेल्या विनोदचे सर्वत्र कौतुक होत आहे.

नेपाळचा पराजय करून विजयी झालेली ' टीम

       एखादयाला गुणवत्ता सिद्ध करायला परिस्थिती आड येत नाही. ज्याप्रमाणे चिखलात कमळ आपले सौदर्य अबाधित ठेवते अगदी तसेच घरची परिस्थिती अत्यंत बिकट असूनही विनोद ने कब्बड्डी मध्ये चमक दाखवली आहे. अल्पशिक्षित असलेले विनोदचे वडील यल्लाप्पा शेती करता -करता  बेळगाव येथील यार्डात हमाली करतात. तर आई दोन मुलांसह जनावरे सांभाळत शेतीला मदत करते. विनोदला तेऊरवाडी माध्यमिक विद्यालयामध्ये क्रीडा शिक्षक एम. ए. पाटील व मुख्याध्यापक  एम. बी. पाटील यांच्याकडून कब्बड्डी शिकायला मिळाली. येथूनच विनोदने कब्बड्डीला आपलेसे केले ते थेट नेपाळपर्यंत विजयाला गवसणी घातली. 

         मागील १५ दिवसापूर्वी महाराष्ट्र राज्याकडून गोवा येथे खेळताना आंध्र प्रदेशला हारवत आंतरराज्यीय स्पर्धा जिंकली होती. काल नेपाळ येथे झालेल्या आंतरराष्ट्रीय कब्बड्डी मध्ये अंतिम सामन्यात नेपाळला धूळ चारवत प्रथम क्रमांकाबरोबर उत्कृष्ठ रायडरचे सुवर्ण पदक मिळवले. एकट्या विनोद ने शेवटच्या मॅच मध्ये १८ रेड पॉईंट मिळवले. महत्वाचे म्हणजे या स्पर्धाना जाण्याच्या अगोदरच्या दिवशी विनोद दिवसभर शेतात काम करत होता. यश मिळवायची जीदद्‌ मनात असेल तर परिस्थिती आडवी येत नाही. "कोशिश करने वालों की कभी हार नही होती. 'याचा प्रत्यय विनोदने आणून दिला. विनोदच्या या कामगिरीमुळे नुसता तेऊरवाडी गावच नव्हे तर महाराष्ट्र राज्यही आनंदी झाला आहे.

1 comment:

Unknown said...

Congratulations and all the best Vinu..

Post a Comment