बेळगाव महानगरपालिकेवर भगवा फडकावणारच, शिवसेनेचे शिनोळी येथे कर्नाटक सीमेवर धरणे आंदोलन, कर्नाटकातील कोनेवाडी येथे फडकवला भगवा - चंदगड लाईव्ह न्युज

21 January 2021

बेळगाव महानगरपालिकेवर भगवा फडकावणारच, शिवसेनेचे शिनोळी येथे कर्नाटक सीमेवर धरणे आंदोलन, कर्नाटकातील कोनेवाडी येथे फडकवला भगवा

 शिवसेनेच्या वतीने शिनोळी येथे कर्नाटक सीमेवर धरणे आंदोलन करताना जिल्हाप्रमुख विजय देवणे, संग्राम कुपेकर, प्रभाकर खांडेकर, संतोेष मळविकर व इतर. 

चंदगड / प्रतिनिधी  

        बेळगाव महानगरपालिकेवर कन्नड रक्षणवेदिक संघटनेने लावलेला लाल पिवळा ध्वज  काढण्यात यावा. या मागणीसाठी शिवसेना आक्रमक झाली असून आज शिनोळी (ता. चंदगड) येथे कर्नाटक सिमेवर कर्नाटक सरकारच्या विरोधात  जोरदार आंदोलन करण्यात आले. तसेच कोणत्याही परिस्थितीत बेळगाव महापालिकेवर भगवा फडकवणारच अशी भूमिका शिवसेनेने घेतली. दरम्यान, बेळगावात प्रवेश करण्याचा प्रयत्न करणाऱ्या शिवसैनिकांना कर्नाटक पोलिसांनी बेळगाव सीमेवर शिनोळी येथे अडवले. यावेळी शिवसैनिक व कर्नाटक पोलिसांत  जोरदार झटापट झाली. त्यानंतर शिवसेनेच्या वतीने बेळगाव -वेगूर्ला महामार्गावर कर्नाटक सीमेवरच ठिय्या आंदोलन केले. कर्नाटक सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी केली.

आक्रमक शिवसैनिक

           मागील पंधरा दिवसांपूर्वी कन्नड रक्षण वेदिके संघटनेने बेळगाव येथील  महानगर पालिकेच्या कार्यालयावर लाल पिवळा ध्वज लावून स्थानिक स्वराज संस्थेवर कर्नाटकची दडपशाही करण्याचा प्रयत्न केला. हा ध्वज काढावा अशी मागणी बेळगाव सह सीमा भागातील मराठी भाषिकांनी केली होती. त्यावर शिवसेनाही आक्रमक झाली आहे.

             कोल्हापूरहून शिवसेनेचे नेते, कार्यकर्ते बेळगावला जाऊन निषेध नोंदवणार होते. यासाठी शिवसेना जिल्हा प्रमूख विजय देवणे, संंजय पवार, प्रा. सुनिल  शिंत्रे, उपजिल्हाप्रमूख प्रभाकर खांडेकर, संघटक संग्राम कूपेकर, सुजित चव्हाण, प्रतिक क्षीरसागर, विराज पाटील, संभाजी पाटील, ॲड. संतोष मळवीकर, शांता जाधव, संज्योती मळवीकर, अशोक मनवाडकर आदी कार्यकर्ते हातात भगवा झेंडा घेऊन छत्रपती शिवाजी महाराज कि जय,जय भवानी, जय शिवाजी, बेळगाव बिदर भालकीसह  संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे. अशा घोषणा देत कर्नाटकात शिरण्याचा प्रयत्न केला. मात्र बेळगाव पोलिसांनी कार्यकर्त्यांना रस्त्यावरच आडवून कार्यकर्त्याच्या हातातील भगवा झेंडा काढुन घेण्याचा प्रयत्न केला. यावेळी शिवसैनिक व पोलिसांत मोठी झटापट झाली. या प्रकरणी बेळगाव येथे मराठी भाषिक संघटना, महाराष्ट्र एकीकरण समिती आज आंदोलन करणार होती. पण पोलीस प्रशासनाने वेळ देण्याचे मान्य केल्यावर ते तात्पुरते स्थगित करण्यात आले आहे. 

         अखेर कर्नाटकातील कोनेवाडी येथे शिवसैनिकांनी भगवा फडकवलाच, शिवसेनेचे कार्यकर्ते शिनोळी मार्गे बेळगावात प्रवेश करणार असल्याने काल रात्रीपासूनच मोठा पोलीस बंदोबस्त कर्नाटक पोलिसांनी सीमेवर शिनोळी येथे फौजफाटा तैनात केला होता. पण कर्नाटक पोलिसांना चकवा देत शिवसेना जिल्हा प्रमुख विजय देवणे, जिल्हा प्रमुख संंजय पवार, प्रा. सुनिल  शिंत्रे, उपजिल्हाप्रमूख प्रभाकर खांडेकर, संघटक संग्राम कूपेकर, सुजित चव्हाण, प्रतिक क्षीरसागर, विराज पाटील, संभाजी पाटील, ॲड. संतोष मळवीकर यांनी कोनेवाडी (ता. जि. बेळगाव) या गावी जाऊन ब्रम्हलिंग युवक मंडळाच्या कार्यालयासमोर भगवा झेंडा डौलाने फडकवला.



No comments:

Post a Comment