गोपाळराव पाटीलांचा भाजपाला रामराम, काँग्रेसमध्ये करणार प्रवेश? - चंदगड लाईव्ह न्युज

28 January 2021

गोपाळराव पाटीलांचा भाजपाला रामराम, काँग्रेसमध्ये करणार प्रवेश?

गोपाळराव पाटील

नंदकुमार ढेरे / चंदगड प्रतिनिधी
भाजपाचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य गोपाळराव पाटील हे कार्यकर्त्यासह राष्ट्रीय काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याची शक्यता आहे. कार्यकर्त्याच्या बैठकीत हा निर्णय झाल्याचे खात्रीशीर वृत्त आहे. त्यामुळे चंदगड तालुक्यात आगामी निवडणुकांत भाजपाला धक्का बसण्याची शक्यता आहे.गोकुळदूध संघ व जिल्हा बॅंक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गोपाळरावांचा काॅग्रेस प्रवेश महत्वाचा मानला जात आहे.काल चंदगड येथे गोपाळराव गटाच्या प्रमुख कार्यकत्यांचा मेळावा पार पडला . या मेळाव्यात पुढची राजकीय वाटचाल कशी करायची याबद्दल निर्णय घेण्यात आला .
गेल्या वर्षी झालेल्या विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत गोपाळराव पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता.भाजपाचे त्यावेळेचे विधानसभेचे उमेदवार म्हणून त्यांनी तालुक्यात पक्ष बांधणी जोरात केली.पण त्याचवेळी माजी मंत्री भरमुआण्णा पाटील हे ही कार्यकर्त्यासह भाजपमध्ये डेरे दाखल झाले. ते ही भाजपामधून विधानसभेला इच्छुक असलेने पक्ष श्रेष्ठी समोर उमेदवारी कूणाला द्यायची हा यक्ष प्रश्न निर्माण झाला होता. अखेर राजकीय समीकरणे जोरात बदलली आंणि चंदगड विधानसभेसाठी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे विश्वासू कार्यकर्ते शिवाजीराव पाटील यांची एंट्री झाली.विधानसभेच्या तोंडावर तालुक्यात भाजप मध्ये अंतर्गत बंडाळी नको म्हणून गोपाळराव पाटील व भरमुआण्णा पाटील या दोघांनाही थांबवून शिवाजीराव पाटील यांना पक्षाने चाल दिली होती. शिवाजी राव यांचा थोडक्या मतांनी पराभव झाला.तालूक्यात भाजपाला विधानसभा सभेला अपयश आले तरी, राज्यात सर्वाधिक आमदार निवडून येऊनही भाजपाचे सरकार बनले नाही. तेव्हा पासूनच गोपाळराव पाटील गटात नाराजीचा सूर होता. राज्यात आणि जिल्ह्यात महाविकास आघाडीची सत्ता आल्यामुळे कार्यकत्यांची म्हणावी तशी शासकीय अथवा इतर कामे होत नाहीत . त्यांना पाहिजे तसे बळ मिळत नाही . त्यामुळे कार्यकत्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर नाराजी आहे.माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांचे भरमूअण्णा पाटील गटाबरोबर जास्त सलोख्याचे संबंध असल्यामुळे गोपाळराव गटाला भाजपकडून म्हणावे तसे सहकार्य मिळाले नाही.त्यामुळेच व आणखीन काही कारणाने गोपाळराव पाटील यांच्या गटात नैराशेची भावना निर्माण झाली होती.ज्या ठिकाणी नेत्याला महत्व नाही त्याठिकाणी कशाला थांबायचे अशी भूमिका कार्यकर्त्यानी घेवून काॅग्रेस मध्ये प्रवेश करावा अशी मागणी लावून धरली आहे. जिल्ह्यात आज पालकमंत्री सतेज पाटील यांचे वर्चस्व वाढले आहे . तसेच गोकुळ , केडीसी आणि भविष्यात अनेक संस्थांच्या निवडणुका पाहता तालुक्यातील बयाच कार्यकर्त्यांनी गोपाळराव पाटील यांच्यावर पुढची राजकीय वाटचाल काँग्रेसबरोबर करावी असे दडपण आणल्याचे समजते . आज झालेल्या मेळाव्यात सर्व प्रमुख कार्यकत्यांनी पालकमंत्री पाटील यांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश करावा असे सुचवले . त्यामुळे हा निर्णय झाल्याचे समजते . फक्त प्रवेशाची तारीख बाकी आहे . परिणामी , चंदगड तालुक्यात भाजपाची ताकत कमी होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

गोपाळराव पाटील यांचा गोकुळ दूध संघ व जिल्हा बॅंक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय काॅग्रेसमधील प्रवेश महत्वाचा मानला जात आहे. त्यांच्या प्रवेशामूळे तालूक्यातील काँग्रेसला बळकटी मिळण्याबरोबरच गोपाळराव याना जिल्हा बॅंकेचे संचालकपदी ही मिळण्याची शक्यता नाकारता येत नाही.


No comments:

Post a Comment