चंदगड तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणुकीचा निकाल जाहीर, स्थानिक आघाड्यांचे वर्चस्व - चंदगड लाईव्ह न्युज

18 January 2021

चंदगड तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणुकीचा निकाल जाहीर, स्थानिक आघाड्यांचे वर्चस्व

ग्रामपंचायतीच्या निकालानंतर जल्लोष करताना विजयी उमेदवार व कार्यकर्ते. 

चंदगड / प्रतिनिधी

         चंदगड तालुक्यातील 41 ग्रामपंचायतीच्या निवडणुका लागल्या होत्या. त्यापैकी 8 ग्रामपंचायती यापूर्वीच बिनविरोध झाल्या आहेत. म्हाळेवाडी, धुमडेवाडी, मलतवाडी, ढोलगरवाडी, केरवडे-वाळकुळी, मुगळी, कानडी, घुल्लेवाडी या ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या आहेत. तालुक्यातील सरासरी मतदान 82.94 टक्के मतदान झाले होते. 33 ग्रामपंचायतीचा निकाल निकाल आज जाहीर झाला. बसर्गे येथील ग्रामपंचायतीमध्ये माजी मंत्री भरमुआण्णा पाटील यांनी, कोवाड ग्रामपंचायती जि.. सदस्य कल्लाप्पा भोगण, हलकर्णी ग्रामपंचायतीमध्ये माजी जि.. सदस्य भरमाण्णा गावडा यानी सत्ता राखली तर अनेक ग्रामपंचायतीमध्ये स्थानिक ग्रामदैवतांच्या नावाने आघाड्यांना संमिश्र यश मिळाले. सकाळी आठ वाजता दाटे येथील ग्रामपंचायतीचा निकाल तहसिलदार विनोद रणवरे यांनी जाहीर केला.

निकालानंतर जल्लोष करताना आसगाव ग्रामपंचायतीचे उमेदवार व कार्यकर्ते. 

         मतदान प्रक्रियेप्रमाणे मतमोजणीही देखील कोठेही अनुचित प्रकार न घडता शांततेत पार पडली. चंदगड तालुक्यामध्ये माजी राज्यमंत्री भरमू पाटील गट, तालुका संघाचे अध्यक्ष राजेश पाटील गट, गोपाळ पाटील गट व शिवाजीराव पाटील गट या स्थानिक गटासह राष्ट्रवादी, स्वाभीमानी, शिवसेना, भाजप आदी पक्षांनी चित्र-विचित्र आघाड्या करुन निवडणुक लढविल्या. ग्रामपंचायतीचा निकाल एकण्यासाठी कार्यकर्ते सकाळपासून तहसिल कार्यालयाच्या आवारात थांबून होते. प्रथम दाटे ग्रामपंचायतीच्या निकाल जाहीर करण्यात आला. एकेका प्रभागाचा निकाल हाती आल्यानंतर कार्यकर्ते जल्लोष करत होते. शेवटी दुपारी बारानंतर कार्यकर्त्यांनी निकाल जाहीर झाल्यानंतर कार्यकर्त्यांनी गुलालाची उधळण करुन आनंदोत्सव साजरा केला. निकालानंतर अनेक गावात फटाकडे वाजवून आनंदोत्सव साजरा केला. सोयीनुसार झालेल्या स्थानिक आघाड्यांचा फार्म्युला यशस्वी झाल्याचे चित्र निकालानंतर स्पष्ट झाले.शिनोळी खुर्द येथील ग्रामपंचायतीच्या प्रभाग क्रमांक एकमध्ये कांचन नारायण पाटील व कांचन परशराम मन्नोळकर या दोन उमेदवारांना 254 इतकी समान मते पडली होती. यावेळी दहा वर्षाच्या विद्यार्थींनी खुषी प्रणय गोंडावळे हिच्या हस्ते काढलेल्या चिठ्ठीमध्ये कांचन परशराम मन्नोळकर यांना विजयी घोषीत करण्यात आले.

 

देवरवाडी येथील ग्रामपंचायतीच्या प्रभाग क्रमांक दोनमध्ये वामन हिरामणी जाधव व राजाराम हिरामणी जाधव हे दोन सख्खे भाऊ एकमेकांविरोधात निवडणुक लढवत होते. यामध्ये 201 मते घेवून राजाराम हिरामणी जाधव हे विजयी झाले तर वामन हिरामणी जाधव यांना केवळ 15 मते मिळाली.  

No comments:

Post a Comment