![]() |
विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तक वितरण करताना जवान अरुण शिवनगेकर, दिपक घोळसे, प्राचार्य एस. जी. पाटील |
अडकूर / सी. एल. वृत्तसेवा
`अशी पाखरे येती' या श्री शिवशक्ती हायस्कूल व ज्यूनिअर कॉलेज अडकूरच्या इयत्ता ११ वी व १२ वीच्या माजी विद्यार्थांच्या ग्रुपने क्रमिक पुस्तकांचे मोफत वितरण केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य एस. जी. पाटील होते.
कॉलेजच्या माजी विद्यार्थ्यानी अशी पाखरे येती हा वॉटस् अॅप ग्रुप स्थापन केला आहे. या गृपमध्ये कॉलेजचे माजी विद्यार्थी सहभागी झाले आहेत. हे सर्व विद्यार्थी कॉलेजसाठी काही ना काही उपक्रम राबवत आहेत.आज या माजी विद्यार्थी वर्गाने ११वी व १२वीच्या विद्यार्थ्याना मोफत पुस्तकांचे वाटप सैन्यदलात कार्यरत असलेले जवान अरूण शिवनगेकर (अडकूर), दिपक घोळसे (अलबादेवी), प्रकाश तेलवेकर, सचिन पाटील, प्रकाश आंबीटकर यांच्या हस्ते पुस्तक वितरण करण्यात आले.
गरीब व होतकरू विद्यार्थ्यांसाठी हे कॉलेज असून या कॉलेजमध्ये सुसंस्काराचे शिक्षण दिले जाते. यामुळेच आम्हाला भारतीय सैन्यदलात देशाची सेवा करण्याची संधी मिळाली असल्याचे विचार जवान दिपक घोळसे व अरूण शिवनगेकर यांनी व्यक्त केले. यावेळी प्राचार्य एस. जी. पाटील यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाला एस. के. हरेर, प्रा. विष्णू पाटील, आर. व्ही. देसाई, एस. के. पाटील आदि मान्यवर उपस्थित होते. प्रास्ताविक प्रा. रामदास बिर्जे यांनी केले तर आभार प्रा. एम. पी. पाटील यांनी मानले.
No comments:
Post a Comment