तुडिये येथे रविवारी हाप पिच नाईट क्रिकेट स्पर्धा - चंदगड लाईव्ह न्युज

03 February 2021

तुडिये येथे रविवारी हाप पिच नाईट क्रिकेट स्पर्धा

कालकुंद्री : सी. एल. वृत्तसेवा 

        तुडिये (ता. चंदगड) येथे एकता कला, क्रीडा मंडळाच्या वतीने रविवारी ७ फेब्रुवारी २०२१ रोजी मर्यादित ५ षटकांच्या हाफ पीच नाईट क्रिकेट स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. विजेता व उपविजेता संघांना २१००१ व चषक, १११११ व चषक तसेच उत्कृष्ट फलंदाज, गोलंदाज यांना आकर्षक चषक अशी बक्षिसे ठेवण्यात आली आहे. प्रत्येक संघात ९ खेळाडू राहतील. ज्या गावचा संघ त्याच गावातील खेळाडू संघात राहतील. रामलिंग हायस्कूल व ज्युनियर कॉलेज तुडिये क्रीडांगणावर होणाऱ्या स्पर्धेत नाव नोंदणीसाठी ८६०५६८३९८७, ८७६७४३०७८५, ८३०८६९२३६२, ७८८७६७५५४२ या मोबाईल नंबर वर संपर्क करण्याचे आवाहन एकता क्रीडा मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.No comments:

Post a Comment