इब्राहिमपूर शौचालय घोटाळा प्रकरण, रक्कम जमा करण्याचे जि. प. चे सीईओ यांनी दिले आदेश, काय आहे प्रकरण वाचा सविस्तर........ - चंदगड लाईव्ह न्युज

03 February 2021

इब्राहिमपूर शौचालय घोटाळा प्रकरण, रक्कम जमा करण्याचे जि. प. चे सीईओ यांनी दिले आदेश, काय आहे प्रकरण वाचा सविस्तर........

                             
चंदगड / प्रतिनिधी

       इब्राहिमपूर (ता. चंदगड) येथे स्वच्छ भारत मिशन  अभियानांतर्गत मंजूर झालेल्या लाभार्थ्यांच्या शौचालय अनूदान वितरणात झालेल्या अनियमितता गैरव्यवहारातील दुबार तसेच अपात्र लाभार्थ्यांकडून १५ फेब्रुवारीपर्यंत प्रोत्साहन अनुदान रक्कम वसूल करण्याचे आदेश मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल यांनी दिले आहेत. तसेच दुबार आणि अपात्र लाभार्थ्यांचा सविस्तर अहवाल सादर करण्याच्या सुचना देखिल गटविकास अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. त्यामुळे अखेर या शौचालय अनुदान घोटाळ्यातील कारवाईला वेग आला आहे.

         इब्राहिमपूर ग्रामपंचायतीमध्ये स्वच्छ भारत मिशन अंतर्गत वैयक्तिक शौचालय अनुदान वितरणात गैरप्रकार झाला होता. त्या अनुषंगाने अनुदान वितरणामध्ये अनियमितता झाल्याबाबतचा अहवाल चंदगड पंचायत समितीच्या गट विकास अधिकारी यांनी सादर केला होता. त्यामध्ये याप्रकरणी अनियमितता झाल्याचे स्पष्ट करण्यात आले होते. मात्र, सदर अहवालामध्ये अनुदान वितरण केलेल्या लाभार्थीना दुबार लाभ दिला आहे की नाही याची स्पष्टता केलेली नसल्याने दुबार लभार्थी तसेच अपात्र लाभार्थ्यांची यादी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी मागविली आहे. तसेच त्यांना दिलेल्या प्रोत्साहन अनुदान रक्कम १५ फेब्रुवारीपर्यंत वसूल करण्याचे आदेश दिले आहेत. या आदेशामुळे तालुक्यात खळबळ उडाली आहे.


No comments:

Post a Comment