माणसा-माणसातील संवाद हरवत चालला आहे - व्ही. एल. सुतार - चंदगड लाईव्ह न्युज

03 February 2021

माणसा-माणसातील संवाद हरवत चालला आहे - व्ही. एल. सुतार

चंदगड तालूका मराठी अध्यापक संघातर्फे मराठी विषयास ९९ गुण मिळवलेल्या अंजली कोठारे चा सत्कार करताना मान्यवर.

चंदगड / सी. एल. वृत्तसेवा

           भावेश्वरी संदेश विद्यालय कानूर येथे चंदगड तालुका मराठी अध्यापक संघामार्फत मराठी भाषा संवर्धन पंधरवडा या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे सचिव अशोक देवण होते. प्रास्ताविक मुख्याद्यापिका सुजाता देवण यांनी केले.

         माणसां-माणसातला हरवत चाललेला संवाद हाही भाषेला मारकच आहे. भाषा टिकवायची असेल तर ती व्यवहाराची भाषा बनून ती जगण्याचे साधन बनले पाहिजे, असे प्रतिपादन संघाचे कोषाध्यक्ष व्ही. एल. सुतार यांनी केले.

      यावेळी भावेश्वरी विद्यालयाची कु. अंजली अनिल कोठारी हिने एस. एस. सी. परीक्षेमध्ये मराठी विषयात ९९ गुण मिळवल्याबद्दल मराठी अध्यापक संघाकडून सत्कार करण्यात आला. त्याचबरोबर महादेव शिवणगेकर यांची नाभिक समाज संघटनेच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल सत्कार करण्यात आला. यावेळी एम. एन. शिवणगेकर, संजय साबळे यांची मनोगते झाली. कार्यक्रमाला संघाचे उपाध्यक्ष बी. एन. पाटील, प्रवक्ते एच. आर. पाऊसकर जी. एन. धुमाळे, संजय नार्वेकर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन विश्वास पाटील यांनी केले.

No comments:

Post a Comment