वाघोत्रे ग्रामपंचायतीच्या वतीने मोफत डोळे तपासणी शिबीराचे आयोजन, कधी आहे हे शिबीर? वाचा.... - चंदगड लाईव्ह न्युज

04 February 2021

वाघोत्रे ग्रामपंचायतीच्या वतीने मोफत डोळे तपासणी शिबीराचे आयोजन, कधी आहे हे शिबीर? वाचा....

 


चंदगड / प्रतिनिधी

         वाघोत्रे (ता. चंदगड) येथे ग्रामपंचायत वाघोत्रे, रुवर्ध फौंडेशन गारगोटी व श्रविका व स्वप्नील आय क्लिनिक अन्ड् ऑप्टिकल्स कडगाव (ता. भुदरगड) यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत डोळे तपासणी शिबीर आयोजित केले आहे. सोमवारी 8 फेब्रुवारी २०२१ रोजी सकाळी १० ते २ या वेळेत हे शिबीर आयोजित केले आहे. 

        या शिबीरामध्ये काच बिंदू तपासणी व उपचार, कॉम्पुटराईज डोळे तपासणी व उपचार, मोती बिंदू तपासणी व उपचार, रोटीना तपासणी व उपचार उपचार, चष्मा नंबर काढून मिळणार आहे. शिबीराला डॉ. गौरेश कुंभार (MS नेत्रतञ) व रोहित मगदूम (OPTO) हे शिबीरामध्ये तपासणी करणार आहेत. शिबीरामध्ये चष्मा नंबर काढल्यानंतर संबंधित व्यक्तीला चष्मा पाहिजे असल्यास चष्म्याचे पैसे भरून घरपोच सेवा दिली जाणार आहे. यासाठी विशाल पाटील यांच्यासी ९१३०७२०५७१ या भ्रमणध्वनीवर संपर्क करावा. या शिबीराला सर्वांनी लाभ घ्यावा असे आवाहन सरपंच संतोष गावडे, उपसरपंच अजय कातकर व ग्रामपंचायत सदस्यांनी केले आहे. 
No comments:

Post a Comment