जिल्हा परिषदेची निवडणुक जनता दल लढवणार - श्रीपतराव शिंदे, निलजीत युवा जनता दलाच्या शाखेचे उद्घाटन - चंदगड लाईव्ह न्युज

04 February 2021

जिल्हा परिषदेची निवडणुक जनता दल लढवणार - श्रीपतराव शिंदे, निलजीत युवा जनता दलाच्या शाखेचे उद्घाटन

निलजीत युवा जनता दलाच्या शाखेचे उद्घाटन प्रसंगी दिपप्रज्वलन करताना श्रीपतराव शिंदे व इतर कार्यकर्ते.


चंदगड (चेतन शेरेगार)

             "देशात श्रमिक कष्टकरी व श्रीमंत भाडंवलदार असे दोन प्रकारचे वर्ग आहेत ही दरी खुप मोठी आहे. यातील विषमता नष्ट करण्यासाठी तरुणानी संघटनेच्या माध्यमातून श्रमीक कष्टक-याच्या बाजूने राहून प्रत्येकाला रोजगार, अन्न, शेतीच्या सुविधा मिळायला पाहिजे. यासाठी प्रयत्न केला पाहिजे जनतेच्या समस्या सोडवण्यात अग्रेसर राहिला पाहिजे. तसेच आगामी जिल्हा परिषदेच्या निवडणुका जनता दलाने लढवून जिंकणार असल्याचा विश्वास गोडसाखचे चेअरमन श्रीपतराव शिंदे यांनी निलजी (ता. गडहिंग्लज) येथे केले. ग्रामीण भागातील पहिली जनता दल युवा शक्ती शाखेच्या उद्घाटन प्रसंगी व्यक्त केले.

स्वागत व प्रस्तावना अजय मजगी यानी केले. यावेळी उपनगराध्यक्ष महेश कोरी यानी ज्या कल्पनेतून गडहिंग्लज मध्ये युवा शक्ती कार्यरत आहे. त्याच संकल्पनेतून येथे ग्रामीण भागातील पहिली शाखा झाल्यामुळे अभिमानास्पद आहे. या माध्यमातून अधिकाधिक लोकांच्या समस्यांचे निराकरण करण्याचे आवाहन करित सर्व पदाधिका-याना शुभेच्छा दिल्या. दरम्यान मान्यवराच्या हस्ते शाखेच्या नामफलकाचे अनावरण व केक कापून  करण्यात आले. कोरोना रोगाला गावच्या वेशीतच आडवण्याचा प्रयत्न करणाऱ्या गावातील डॉक्टर, कर्मचारी, आशा अंगणवाडी सेवीका, माजी सैनिक व सहभागी ग्रामस्थाचा मंडळाकडून कोरोना योद्धा म्हणून गौरवण्यात आले.

    यावेळी राजेद्र माडेंकर, राम मजगी, अजित शिंदे, आप्पासाहेब पाटील, फिरोज सय्यद, संजय पाटील, बाळगोंडा पाटील, परसू परसापगोळ, आप्पासाहेब हुली, कार्यकर्ते व ग्रामस्थ उपस्थित होते. आभार सविता वाळकी मानले.No comments:

Post a Comment