चंदगड तहसीलवर शुक्रवारी दौलतच्या सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचा मोर्चा, वाचा काय आहेत मागण्या? - चंदगड लाईव्ह न्युज

04 February 2021

चंदगड तहसीलवर शुक्रवारी दौलतच्या सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचा मोर्चा, वाचा काय आहेत मागण्या?

दौलत कारखान्याचे संग्रहित छायाचित्र

चंदगड / प्रतिनिधी 

         दौलत शेतकरी सहकारी साखर कारखान्याचे कामगार आपल्या विविध मागण्यांसाठी शुक्रवार दि. ५ फेब्रुवारी २०२१ रोजी चंदगड तहसील कार्यालयावर मोर्चा काढणार असल्याची माहिती कामगार प्रतिनिधी वसंत पाष्टे यांनी दिली. 

      सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचा थकीत पगार, १५ व १८ टक्के वेतनवाढीचा फरक, ग्रॅच्युईटी, कामगार सोसायटीचे शेअर्स व ठेव, कामगार कल्याण मंडळातील ठेव, दौलत सुतगिरणीचे शेअर्स रक्कम, कर्मचाऱ्यांच्या पगारातून इतर पतसंस्था के बँकाच्या कर्जाचे हफ्ते पगारातून कपात झालेले आहेत. परंतु संबंधीत बँकातून भरलेले नाहीत. ती रक्कम परत मिळावी. या प्रमुख मागण्यांसाठी दौलतचे सेवानिवृत्त कामगार शुक्रवारी तहसील कार्यालयावर मोर्चा काढणार आहेत. शुक्रवारी दुपारी १२ वाजता चंदगडच्या रवळनाथ देवालयापासून मोर्चाला सुरूवात होणार असून दौलतच्या कामगारांनी रवळनाथ देवालयात ११ वाजता उपस्थित रहावे, असे आवाहन वसंत पास्टे, विठ्ठल पाटील, गोविंद गावडे, सुरेश सुतार, अरूण होंगल, धाकलू वर्पे, डी. एस. पताडे यांनी केले आहे.




No comments:

Post a Comment