![]() |
मलतवाडी येथील विविध विकास कामांच्या शुभारंभ प्रसंगी बोलताना खासदार संजय मंडलिक, व्यासपिठावर आमदार राजेश पाटील, ॲड. सुरेश कुराडे. |
तेऊरवाडी / सी. एल. वृत्तसेवा
चंदगडने नेहमिच मदतीचा हात दिला आहे. येथील ग्रामिण भागाचा विकास करण्यावर माझे लक्ष केंद्रित आहे. त्याबरोबरच जोपर्यंत सिमाभागाचा प्रश्न सुटत नाही तोपर्यंत येथील सिमा भागातील सर्वाना सहकार्य करण्यात येईल असे विचार कोल्हापूर लोकसभा मतदार संघाचे खासदार प्रा. संजय मंडलिक यांनी व्यक्त केले. मलतवाडी (ता. चंदगड) येथे विविध विकास कामांच्या शुभारंभ प्रसंगी खासदार मंडलिक बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी चंदगड विधानसभा मतदार संघाचे आमदार राजेश पाटील होते.
खासदार मंडलिक पुढे बोलताना म्हणाले ग्रामिण भागाचा विकास करणे हे माझे स्वप्न आहे. दुर्देवाने कोरोनामुळे मोदीनी खासदारकीचा फंड गोठवला. यामुळे विकासकामावर बंधने आली आहेत. पण कोरोनाला संकट न मानता संधी मानली. जो काही फंड मिळाला त्याचा वापर आरोग्य यंत्रणा सक्षमीकरण करण्यासाठी वापरला. सध्या परत कोरोनाचा फैलाव वाढत आहे. संकट पून्हा येतेय. त्यामुळे सर्वानी दक्षता घेण्याचे गरजेचे आहे. गावच्या विकासात महिला महत्वाच्या आहेत. ग्रामपंचायतीने प्रश्नांचा अनुक्रम ठरवून शाश्वत विकासची कामे करण्यास प्राधान्य द्या.
सिमा भागाचा प्रश्न जोपर्यंत सुटत नाही तोपर्यंत या सिमाभागाला सहकार्य करण्याचा प्रयत्न राहिल . यासाठीच सिमा भागात शिवाजी विद्यापिठ उपकेंद्र निर्माण होत आहे . ज्या गावाने आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळणारा मल्ल दिला त्या मलतवाडीत तालिम बांधणे माझे कर्तव्य असून चंदगडच्या सर्वांगीन विकासासाठी आमदार राजेश पाटील सक्षम आहेत असे सांगून बुध्दीवंतांचा वारसा लाभलेल्या चंदगड तालूक्याला सर्वोतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन खासदार मंडलिक यानी दिले.
आमदार राजेश पाटील बोलताना म्हणाले, ``खूप विविश्वासाने मला आमदारकीची संधी येथील मतदारानी दिली आहे , त्याची जाणीव मला आहे . पुरोगामी विचाराचा वारसा आणि वसा घेऊन खासदार मंडलिक कार्य करत आहेत.तालूका विचारवंताचा असल्याने विचारानेच पराभव करतात. तालूका मागासलेला नाही. शेतीचे पाणी प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करणार आहे. गोकूळ साठी या विभागाने चांगल्या प्रतिचे म्हैस दूध पुरवले आहे. २०० कोटींची काजू येथे उत्पादीत होते. तालूका संघाकडून माहिलाना मोठी रोजगाराची संधी दिली आहे. महिला सक्षमीकरण सरकार महिलांच्या पाठीशी आहे. या भागाने माझी पाठराखन केली असून विचारवंत माझ्या पाठीशी आहेत त्यामूळे आपला स्वाभिमान कोठेही गहाण ठेवू नका, शिवाजी विद्यापिठ उपकेंद मंजूर केले असून विकासासाठी राजकारण बाजूला ठेवून आम्हाला साथ दिल्यास आपल्याविकासाला कधीच कमी पडणार नसल्याचे विचार आमदार पाटील यानी व्यक्त केले.
यावेळी राष्ट्रीय काँग्रेसचे सरचिटणीस ॲड. सुरेश कुराडे, सौ. नम्रता पाटील, मारूती लांडे यानी मनोगते व्यक्त केली. प्रथम विविध विकास कामांचा शुभारंभ खासदार संजय मंडलिक व आमदार राजेश पाटील यांच्या हस्ते करण्यात आला. यानंतर ग्रामपंचायतीमध्ये बिनविरोध निवडूण आलेल्या सरपंच, उपसरपंच व सदस्य तसेच इतर काही मान्यवरांचा सत्कार खासदार मंडलिक यांच्या हस्ते करण्यात आला. या कार्यक्रमाला गडहिंग्लज कृषी उत्पन्न बाजार समितीचे अध्यक्ष अभय देसाई, अशोकबाळ देसाई, तानाजी गडकरी, राष्ट्रवादीचे अध्यक्ष भिकू गावडे, चिटणीस परशराम पाटील, पी. बी. पाटील, दयानंद पाटील यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रास्ताविक एम. आय. कांबळे यांनी केले. सुत्रसंचालन आप्पाजी रेडेकर यांनी केले. आभार दत्तू पाटील यानी मानले.
No comments:
Post a Comment