ताम्रपर्णी नदीत मगरीचा वावर, वन विभागाकडून नागरिकांना सतर्कतेचे आवाहन, कोठे? वाचा सविस्तर.......... - चंदगड लाईव्ह न्युज

18 February 2021

ताम्रपर्णी नदीत मगरीचा वावर, वन विभागाकडून नागरिकांना सतर्कतेचे आवाहन, कोठे? वाचा सविस्तर..........

चिंचणे (ता. चंदगड) येथील ताम्रपर्णी नदीकाठी आढळून आलेली मगर

कोवाड /सी. एल. वृत्तसेवा

          चंदगड तालुक्यातील ताम्रपर्णी नदीकाठावरील चिंचणे या गावानजीक  नदीपात्रात १ मगर व ३ मगरीची पिल्ले दिसून आल्याचे ग्रामस्थाना आढळले असून त्याबाबतचे फोटो तसेच व्हीडिओ फुटेज हे ग्रामस्थानी वनविभागाला पाठविले नंतर वनविभागाने मगरीचा वावर अधोरेखित केला असून नदीकाठच्या चिंचणे,कुदनूर आणि दुडंगे गावातील नागरिकांना सवधानता बाळगण्याविषयी आवाहन केले आहे.

       मागील वर्षी मार्च एप्रिल दरम्यान अश्या प्रकारे मगरीचा वावर स्पष्ट झाला होता. अडविण्यात आलेले पाणी, मुबलक प्रमाणात मिळणारे  मास्यांचे खाद्य यामुळे याठिकाणी मगरीचा वावर,अधिवास असल्याचे यावेळी वनविभागाचे वनक्षेत्रपाल दत्ता पाटील यांनी सांगितले. सदर ठिकाणी वनपाल जी आय होगडे, एस. एस. जितकर, वनमजुर लहू पाटील, मारुती निर्मळकर या पथकाने  पाहणी केली असून सदर भागावर वनविभाग लक्ष ठेऊन आहे.

     मगर हा वन्यप्राणी सकाळचे कोवळे ऊन खाण्यासाठी पाण्याबाहेर येतो. त्यामुळे लहान मुले तसेच महिलांनी व ग्रामस्थानी ठिकाणी जाण्याचे टाळून सावधानता बाळगण्याचे आवाहन पाटणे वनविभागाचे वन क्षेत्रपाल दत्ता पाटील यांनी केले आहे..

No comments:

Post a Comment