प्रांताधिकारी विजया पांगारकर यांना चंदगड भूषण पुरस्कार जाहीर, कशाबद्दल व कोणी दिला हा पुरस्कार? - चंदगड लाईव्ह न्युज

18 February 2021

प्रांताधिकारी विजया पांगारकर यांना चंदगड भूषण पुरस्कार जाहीर, कशाबद्दल व कोणी दिला हा पुरस्कार?

विजया पांगारकर


चंदगड / प्रतिनिधी

         कोल्हापूर जिल्ह्यातील प्रतिष्ठित समजला जाणारा चंदगड भूषण पुरस्कार या वर्षी विजया पांगारकर यांना जाहीर झाला आहे. मंगळवारी (ता. २३) पंचायत समितीमध्ये संध्याकाळी ४ वाजता चंदगड विधानसभा मतदारसंघाचे आमदार राजेश पाटील यांच्या अध्यक्षतेखाली प्रमुख मान्यवरांच्या हस्ते पुरस्काराचे वितरण होणार आहे. गेल्यावर्षी पूरपरिस्थितीत केलेले व्यवस्थापन, पुनर्वसनाचे प्रश्न, कोविड काळात केलेली कामगिरी, शासनाच्या योजना तळागाळापर्यंत पोहोचवण्यासाठी केलेला प्रयत्न, विचारात घेऊन चंदगड भूषण समितीने एकमताने विजया पांगारकर यांना हा पुरस्कार जाहीर केला.

        जिल्हाधिकारी दौलत देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली काम करताना अत्यंत प्रामाणिक, कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून अल्पकाळात त्यांनी नावलौकिक मिळवला आहे. महसूल खात्यात येण्यापूर्वी त्यांनी प्रिंट मीडिया, इलेक्ट्रॉनिक मीडियात काम केले. प्रशासनावर पूर्ण वचक ठेवत जनतेच्या प्रश्नात कायदेशीर चौकट सांभाळताना कायदा व व्यवहार यांची सांगड घालून त्यांनी काम केले आहे. महिला अधिकारी असूनही पुराच्या आपत्तीच्या काळात जनतेच्या मदतीसाठी रात्रंदिवस त्या सक्रिय होत्या. कोविड काळात स्वत;माईक घेऊन गावोगावी फिरून लोकांमध्ये जनजागृती केली. पुनर्वसनाचे प्रश्न खूप चांगल्या प्रकारे त्यांनी हाताळले. त्यांनी केलेल्या कर्तव्यनिष्ठ अलौकिक कामाचा गौरव करण्यासाठी निवड समितीने चंदगड भूषण पुरस्कारासाठी त्यांची निवड केली आहे. 



No comments:

Post a Comment