बसर्गे येथे माजी राज्यमंत्री भरमू पाटील यांच्या हस्ते विकास कामांचा शुभारंभ - चंदगड लाईव्ह न्युज

12 February 2021

बसर्गे येथे माजी राज्यमंत्री भरमू पाटील यांच्या हस्ते विकास कामांचा शुभारंभ

बसर्गे येथे माजी विकास कामांचा शुभारंभ करताना राज्यमंत्री भरमू पाटील. 

चंदगड / प्रतिनिधी

     बसर्गे (ता. चंदगड)  येथे विविध विकास कामांचा शुभारंभ माजी राज्यमंत्री भरमू पाटील यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. 

      जि. प. सदस्य सचिन बल्लाळ यांच्या फंडातून नळपाणी योजनेसाठी सुमारे साडेबारा लाख रुपये तसेच महादेव मंदिर सुशोभिकरण कामाचा शुभारंभ आज करण्यात आला. या प्रसंगी  जि. प सदस्य सचिन बल्लाळ, नगरसेवक दिलीप चंदगडकर, गोकूळ संचालक दिपक पाटील, 

सुरेश सातवणेकर, वसंत चव्हाण, मारुती कुट्रे,रामा पाटील, तुकाराम बेनके, नारायण सुबराव पाटील, नुतन सदस्य सुभाष पाटील, आप्पाजी बेनके, शितल चव्हाण, कलावती सोनार, मनिषा ओऊळकर, विमल दोरुगडे, अनिता पाटील उपस्थित होते. नुतन सरपंच तुकाराम धोंडिबा कांबळे,उपसरपंच सागर सदानंद गुरव यांचा यावेळी सत्कार करण्यात आला.  No comments:

Post a Comment