![]() |
चालक तुकाराम कदम सखाराम लांबोर नागुबाई लांबोर सुनिता लांबोर |
चंदगड / प्रतिनिधी
पंढरपूर येथे अस्थी विसर्जन करून विठूरायाचे दर्शन साठी निघालेल्या चंदगड तालुक्यातील भाविकांच्या बोलेरो गाडीला पंढरपूर येथे अपघात झाला. या अपघातात १६ प्रवाशांपैकी ५ जणांचा मृत्यू झाला आहे. तर ११ जण जखमी आहेत. हे सर्व चंदगड तालुक्यातील असल्याने चंदगड वारकरी संप्रदाय व तालुक्यात दिवसभर दुःखाची छाया पसरली आहे.
![]() |
हायवेरील घटनास्थळी ट्रक व बोलेरो |
अपघातामध्ये चंदगड तालुक्यातील सखाराम धोंडीबा लांबोर (वय-५०), शादुबाई लक्ष्मण लांबोर (वय-६२, रा. घनगरवाडी, धामणे, बेळगाव-कर्नाटक), पिंकी उर्फ सुनिता जानु लांबोर (वय-११), नागुबाई काळु लांबोर (वय-६५), तुकाराम खदु कदम (वय-५०,रा. बांद्राई, कलिवडे, ता. चंदगड) या व्यक्ती मयत झाल्या आहेत.
तर धोंडीबा बापु लांबोर (वय-८७), कोंडदेवा बापु लांबोर (वय-७), कोमल बापु लांबोर (वय-७), बबन लांबोर (वय-४५), भारती बापु लांबोर (वय-५४), रोहीत यशवंत कांबळे (वय-२०), बापु कलाप्पा लांबोर (वय२५), कोंडीबा विठ्ठल लांबोर (वय-५), कावुलाल लांबोर (वय-७०), नागुबाई ग्यानु कोकरे (वय-५०), धोडीबा सखाराम डोईफोड (वय-६०) हे सर्वजण जखमी आहेत. यांच्यावर उपजिल्हा रुग्णांलयात उपचार सुरु आहेत.
अपघातातील बोलोरो गाडीचा तुकाराम पाटील हा चालक (बोलेरो जीप नं. KA.04, MB 9476) कलिवडे (ता. चंदगड) येथील रहिवासी आहे. गाडी भाडे करून घराचा उदरनिर्वाह करण्यासाठी सहा महिन्यापूर्वीच त्यांनी बोलेरो गाडी कर्ज काढून घेतली होती. कर्ज फेडण्यापूर्वीच काळाने त्यांच्यावर घाला घातला.
कोदाळी पैकी बादराई वाडा येथे राहणारे नागरिक उदरनिर्वाहासाठी दररोज मोलमजुरीला जात असतो. घरची गरिबची परिस्थिती असल्याने अपघात मयत झालेल्या नागरिकांना शासनाने सानुग्रह मदत तात्काळ जाहीर करावी अशी मागणी कोदाळीच्या सरपंच सोनाली गवस यांनी केली आहे.
No comments:
Post a Comment