बागलिगे येथे सरपंच निवड दिवशीच तीस लाखाच्या विकास कामाचा शुभारंभ - चंदगड लाईव्ह न्युज

10 February 2021

बागलिगे येथे सरपंच निवड दिवशीच तीस लाखाच्या विकास कामाचा शुभारंभ

बागिलगे (ता. चंदगड) येथे विकास कामांच्या शुभारंभ प्रसंगी बोलताना मानसिंगराव खोराटे.

सी. एल. वृत्तसेवा, चंदगड

          गावचा एकोपा गावच्या विकासाला चालना देत असतो. यासाठी गावात गुण्यागोविंदानं कारभार चालल्यास गावचा विकास व्हायला जास्त वेळ लागत नाही.असे मत दौलत अथर्व ट्रेडर्सचे मॅनेजिंग डायरेक्टर मानसिंग खोराटे यांनी व्यक्त केले. चंदगड तालुक्यातील बागीलगे येथे सरपंच निवड दिवशी विकास कामाचा शुभारंभ प्रसंगी ते बोलत होते.

   गावच्या विकासात ग्रामपंचायतीचे योगदान महत्वाचे असून ग्रामपंचायतीच्या सर्व सदस्य एकोप्याने गावच्या विकासाचा ध्यास घेतल्यास गावात नंदनवन फुलण्यासाठी जास्त वेळ लागणार नाही .गावच्या विकासाचा ध्यास हा प्रत्येकाच्या मनात असला पाहिजे तरच ग्रामपंचायत विकास कामे करू शकते असे मत दौलत अथर्व चे मॅनेजिंग डायरेक्टर मानसिंग खोराटे यांनी व्यक्त केले. चंदगड तालुक्यातील बागीलगे येथे सरपंच निवडीत दिवशीच 30 लाखाच्या विकास कामाच्या शुभारंभ प्रसंगी बोलत होते. सुरुवातीला राज्य कर अधिकारी गोपाळ पाटील यांनी प्रास्ताविकातून निवडणुकीच्या वेळेला जो जाहीरनामा सादर केला होता तो फक्त दोन वर्षात पूर्ण करू असे आश्वासन देऊन गावच्या विकासासाठी आपण अहोरात्र झटू आणि विकास कामे खेचून आणू असे आश्वासन दिले. यावेळी जिल्हा परिषद सदस्य कल्लाप्पा भोगण यांच्या फंडातून मंजूर केलेल्या विविध विकास कामांचा शुभारंभ याप्रसंगी करण्यात आला .सरपंच निवडी दिवशीच 30 लाखाच्या विकास कामाचा शुभारंभ करणारी कोल्हापूर जिल्ह्यातील ही पहिली ग्रामपंचायत म्हणून बागीलगे गावचा उल्लेख करावा लागेल.बागिलगेच्या विकासासाठी जिल्हा परिषद फंडातून जितका निधी देता येईल तितका देण्याचा आपण प्रयत्न करू . गोपाळ पाटील सारख्या क्लासवन अधिकाऱ्याचा उपयोग गावाने गावच्या विकासासाठी करून घ्यावा असे उद्गगार जिल्हा परिषद सदस्य कल्लाप्पा भोगण यांनी व्यक्त केले. राज्य कर अधिकारी अधिकारी गोपाळ पाटील यांनी गावच्या वाचनालयासाठी वीस हजार रुपये किमतीची स्पर्धा परीक्षेची पुस्तके गावचा वाचनालयासाठी यावेळी बहाल केली.

        यावेळी ग्रामपंचायतीच्या नवनिर्वाचित सरपंच उपसरपंच व सदस्यांचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. व्यासपीठावर जिल्हा परिषद सदस्या विद्याताई विलास पाटील, राज्यकर अधिकारी गोपाळ पाटील, माजी पंचायत समिती सभापती शांतारामबापू पाटील, सरपंच नरसु पाटील, एस. के. पाटील, एस. एस. आवडण, पुंडलिक भोगण, नारायण कणुकले यांच्यासह अनेक मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन दयानंद पाटील यांनी केले तर आभार गणपत पाटील यांनी मानले.



No comments:

Post a Comment