गॅस दरवाढीच्या निषेधार्थ कुदनूर येथे चूल पेटवा आंदोलन - चंदगड लाईव्ह न्युज

10 February 2021

गॅस दरवाढीच्या निषेधार्थ कुदनूर येथे चूल पेटवा आंदोलन

कुदनुर येथे गॅस दरवाढीच्या निषेधार्थ चूल पेटवा आंदोलन करताना पुष्पमाला जाधव व महिला

कालकुंद्री : सी एल वृत्तसेवा                    

       कुदनूर (ता. चंदगड) येथे आज बुधवारी आठवडी बाजार दिवशी गॅस दरवाढीच्या निषेधार्थ चूल पेटवा आंदोलन करण्यात आले. माजी जिप अध्यक्ष पुष्प मला जाधव यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या आंदोलनात गावातील मध्यवर्ती ठिकाणी लाकडानी चूल पेटवून आंदोलन केले. यात गावातील महिला मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या. पेट्रोल डिझेल सोबतच दिवसागणिक वाढणार्‍या गॅस सिलेंडरच्या दरामुळे गृहिणींचे बजेट कोलमडले आहे. 

या दरवाडी साठी केंद्र शासनाला जबाबदार धरत निषेधाच्या घोषणा देण्यात आल्या. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पुरस्कृत आंदोलनात पुष्पमाला मोहनराव जाधव यांच्यासह सौ सविता महेंद्र जाधव, आनंदी नारायण कोकीतकर, सिंधू मारुती खामकार, आक्कुबाई पांडूरंग कोले, दिपाली शिवानंद मुक्कनावर, नर्मदा लक्ष्मण कालकुंद्रीकर, शांता शिवपूत्र कोरी, शांता प्रकाश कोरी, लता निंगाप्पा कोकीतकर, चंद्रभागा संजय आंबेवाडकर, श्रीमती आनंदी  गवेकर, शारुबाई कल्लू बंबर्गेकर, सुगंधा बामणे आदी महिला सहभागी झाल्या होत्या.

No comments:

Post a Comment